शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
3
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
8
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
9
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
10
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
11
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
12
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
13
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
14
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
15
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
16
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
17
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
18
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
20
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!

महापालिकेत अधिकाऱ्यांची गटबाजी

By admin | Updated: December 24, 2015 01:49 IST

आर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. एकमेकांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली जात नाही

नामदेव मोरे,  नवी मुंबर्ईआर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. एकमेकांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आरोग्य, विद्युत, अभियांत्रिकी, सचिव विभागासह सर्वच ठिकाणी हे प्रकार सुरू असून त्यामुळे महापालिकेची बदनामी व नुकसान होवू लागले आहे. विधान परिषदेमध्येही याचे पडसाद उमटले असून सह शहरअभियंत्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. नवी मुुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत असताना दुसरीकडे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी एकमेकांविरोधात षड्यंत्र रचण्यात मश्गूल झाले आहेत. सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्याविरोधात आमदार नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. राव कनिष्ठ अधिकाऱ्यांना शिव्या देतात. महिला कर्मचाऱ्यांनाही वाईट वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी सुरू केली आहे. वास्तविक या विभागामधील कार्यकारी अभियंता सुनील लाड व राव यांच्यामध्ये काही महिन्यांपासून विस्तवही जात नाही. लाड व इतर काही सहकाऱ्यांनी सहशहर अभियंता शिव्या देत असल्याचे गाऱ्हाणे सर्र्वांपुढे मांडण्यास सुरवात केली आहे. लाड व इतरांच्या चौकशीचे पत्र आयुक्तांना दिल्यानंतर हे प्रकार सुरू झाल्याचे राव यांनी स्पष्ट केले होते. राव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध व्हावे यासाठी त्यांच्याच विभागातील अधिकारी प्रयत्न करू लागले आहेत. वास्तविक लाड व राव हे पालिकेतील भांडणाचे एकमेव उदाहरण नाही. यापूर्वी शहर अभियंता मोहन डगावकर व राव यांच्यामध्येही फारसे सौख्य नसल्याचे पहावयास मिळाले होते. सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी एकमेकांची बदनामी करत आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांच्यावर हिरानंदानी कराराचा ठपका ठेवून त्यांनी आरोग्य सेवेची वाट लावल्याची माहिती त्यांच्याच सहकाऱ्यांनी पसरविली. त्यांना पदावरून दूर जावे लागलेच शिवाय अनेक वर्षे कोणतीच महत्त्वाची जबाबदारी दिली नाही. त्यांच्यानंतर आलेल्या डॉ. दीपक परोपकारी यांच्याविरोधातही आरोग्य विभागातील काही सहकाऱ्यांनी जुने प्रकरण उकरून काढून त्यांची बदली करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागेवर आलेल्या डॉ. रमेश निकम यांच्यावर रुग्णालय सुरू करण्याची दिरंगाईचे कारण सांगत पदावरून दूर करत पुन्हा परोपकारींकडे पदभार देण्यात आला. यापूर्वी सचिव असलेल्या चंद्रकांत देवकर यांच्याविरोधात त्यांच्याच विभागातील एक सहकारी वाईट मत व्यक्त करत. यानंतर स्वत:ची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होत नसल्याने मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर किती वाईट आहेत हे एक अधिकारी फोन करून पत्रकारांना माहिती देवू लागले होते. सिन्नरकर यांच्याकडेच महत्त्वाच्या पदांचा कार्यभार का अशी टीका करणाऱ्यांनी नोकरभरतीमध्ये त्यांनी घोटाळा केला असल्याची माहिती पसरविली होती. पालिकेची सर्वाधिक बदनामी होण्यास कारणीभूत असलेल्या अतिक्रमण घोटाळ्यात गुप्त चौकशी अहवाल काही अधिकाऱ्यांनीच फोडून तो बाहेरील व्यक्तींना दिला होता. मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदेंकडे, अमरीश पटनिगिरे, उपआयुक्त नाना आल्हाट, ईटीसी केंद्र संचालिका वर्षा भगत यांच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये पालिकेचेच अधिकारी व त्यांचे सहकारी यांचा समावेश होता. वारंवार बदल्यांना सामोेरे जावे लागणारे सुभाष गायकर, रमाकांत पाटील, विद्युत विभागातील कर्मचारी रवींद्र फुणगे व इतर अनेक कर्मचारी यांच्याविरोधात त्यांच्याच सहकाऱ्यांनी बदनामीची मोहीम उघडली होती. वास्तविक अधिकाऱ्यांवर आरोप झाले पण कोणावरील आरोप सिद्ध झाला नाही व तक्रारदारांनीही त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला नव्हता. गटबाजीमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत असून ही गटबाजी थांबवणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.