शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकच्या मार्गात वाहनांचा अडथळा; ज्येष्ठ नागरिकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:32 IST

रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग : ज्येष्ठ नागरिकांची कसरत

नवी मुंबई : बेकायदा पार्किंगचा प्रश्न सध्या जटिल झाला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची पार्किंग दिसून येते. विशेष म्हणजे नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी नियोजन केलेल्या मॉर्निंग वॉकच्या रस्त्यांवरसुध्दा अलीकडच्या काळात वाहने पार्क केली जात आहेत. दोन्ही बाजूला पार्क होणाऱ्या वाहनांमुळे पदपथ अडविले जातात. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत असून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वाहनांच्या बेशिस्त व मनमानी पार्किंगमुळे शहरातील दळणवळण यंत्रणा चांगलीच प्रभावित झाली आहे. शहराच्या विविध नोडमध्ये जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. कोपरखैरणेतील महापालिकेचे निसर्ग उद्यान परिसरातील रहिवाशांसाठी पर्वणीचे ठरले आहे. निसर्ग उद्यानापासून कोपरखैरणे गावच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ फिरायला येणाऱ्यांची रीघ लागलेली असते. तसेच या परिसरात असलेल्या उद्यानातसुध्दा अबालवृध्दांची गर्दी असते. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या उद्यानांत फारशी गर्दी नसली तरी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्याला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ट्रक, टँकर, खासगी बसेस, मोडकळीस आलेल्या रुग्णवाहिका, टुरिस्टची वाहने आदी प्रकारच्या वाहनांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. 

विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही वाहने पार्क केली गेल्याने मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची कसरत होत आहे. नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाने या वाहनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

अद्याप कारवाई नसल्याने रहिवाशी नाराज

या रस्त्यालगत मोजकीच नागरी वसाहत आहे. त्यातील रहिवासी आपली वाहने वसाहतीच्या आतच उभी करतात. असे असताना रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जाणारी वाहने कुठली आहेत, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. काही वाहने मागील अनेक दिवसांपासून एकाच जागेवर उभी आहेत. शिवाय नोंदणी क्रमांकावरून यातील बहुतांश वाहने शहराबाहेरील असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या बेकायदा पार्किंगच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी गेल्या महिन्यात संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. परंतु कारवाई झाली नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई