शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची टोल नाक्यावर अडवणूक; वाहतूकदाराने जाब विचारताच वाहने टोल फ्री सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:20 IST

या प्रकरणी गोठीवली गावचे वाहतूकदार दीपक म्हात्रे यांनी टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना धारेधर धरत चांगलेच सुनावले.

नवी मुंबई : आॅक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांची ऐरोली टोल नाक्यावर अडवणूक करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.दिवसेंदिवस राज्यात कोविड १९ चे रुग्ण झपाट्याने वाढत असताना कृत्रिम आॅक्सिजनची कमतरता भासत असल्याने सर्व हॉस्पिटलला आॅक्सिजनपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने आॅक्सिजन बनविणाºया कंपन्या हे आॅक्सिजनची वाहतूक करीत असताना ऐरोली टोलनाक्यावर ही वाहने अडवून जबरदस्तीने टोलवसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोठीवली गावचे वाहतूकदार दीपक म्हात्रे यांनी टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना धारेधर धरत चांगलेच सुनावले. बुधवारी, १६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आॅक्सिजन वायूचा पुरवठा करणारी वाहने अडविण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा या वाहनांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे सकाळी दीपक म्हात्रे यांनी ऐरोली टोलनाक्यावर जाऊन तेथील अधिकाºयांना जाब विचारला असता काही तासांनी वाहने सोडून देण्यात आली.दरम्यान, या प्रकाराबद्दल ऐरोली टोलनाक्याच्या संबंधित अधिकाºयांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वी आॅक्सिजन वाहतूक पुरवठा करणाºया वाहनांकडून टोल वसुली केली जात होती. त्यानुसार आम्ही टोलची रक्कम घेत होतो. मात्र अशा वाहनांना टोल माफ केल्याचे अधिकृत पत्र शासनाकडून आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही टोलची मागणी करीत होतो.नवी मुंबईतील अनेक प्लांटमधून आॅक्सिजन वायूचा पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर आदी ठिकाणी ट्रक आणि टेम्पोतून केला जातो. मात्र सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून अशा वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेला असताना टोलसाठी अडवणूक करणे चुकीचे होते. त्यांना जाब विचारल्यानंतर अशी वाहने सोडून देण्यात आली.- दीपक म्हात्रे, आॅक्सिजन वाहतूकदार, गोठीवली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई