शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएविरोधात १२४ गावांच्या ६ हजार ग्रामस्थांच्या हरकती;  नवनगर प्रकल्पाला विरोध

By कमलाकर कांबळे | Updated: March 27, 2024 19:31 IST

पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार

नवी मुंबई : एमएमआरडीएच्या माध्यमातून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या नवनगर प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या. राज्य शासनाने सादर केलेल्या नवनगर प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्यात अनेक त्रुटी असून त्यामुळे येथील ग्रामस्थांची शंभर टक्के जमीन हिरावून घेतली जाणार असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदविला आहे.

राज्य शासनाने सिडकोच्या खोपटा प्रकल्पातील ३२ आणि नैना क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० अशा १२४ गावांचा समावेश करून नवनगर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४ मार्चपासून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्याला या विभागातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून येथील भूधारकांकडून मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती सादर केल्या जात आहेत. बुधवारी कोकण भवन येथील सहसंचालक नगररचना कार्यालयात जवळपास सहा हजार हरकती सादर केल्या. शेतकऱ्यांनी नगर रचना विभागाच्या सहसंचालकांकडे सादर केलेल्या अर्जात विविध प्रकारच्या ९ मुद्यांवर हरकत नोंदविली आहे. तर दोन सूचना केल्या आहेत. सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी ३ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

मुंबई पारबंदर प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी नवनगर प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. याअंतर्गत अधिसूचित १२४ गावांतील संपूर्ण जमिनी सक्तीने संपादित केल्या जाणार आहेत. नवी मुंबई प्रकल्पात झाले, तेच या नवनगर प्रकल्पात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध असल्याचे शहाजी आनंदराव पाटील यांनी स्पष्ट केले.