शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

चळवळीची धुरा आता युवकांवर

By admin | Updated: January 26, 2016 02:04 IST

पनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे

नामदेव मोरे , नवी मुंबईपनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. दि. बा. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण आयुष्य या चळवळीसाठी खर्च केले. आता या चळवळीची धुरा युवकांनी खांद्यावर घेतली असून घरबचाव, रोजगारापासून सर्व प्रश्न सोडविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर नवी मुंबईची उभारणी झाली आहे. भूमिपुत्रांनी तब्बल १७ हजार हेक्टर जमीन शहर वसविण्यासाठी दिली. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, विमानतळ, जेएनपीटी, तळोजा परिसरातील एमआयडीसी सर्व प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी त्यांची जमीन दिली. या बदल्यात शासनाने अत्यंत अल्प मोबदला दिला. जवळपास ५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त न्याय हक्कासाठी भांडत आहेत. जमिनीचा वाढीव मोबदला, साडेबारा टक्के जमीन, मिठागार कामगार व बलुतेदार यांचे भूखंड, एमआयडीसी व जेएनपीटीमुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षच करावा लागला. विनासंघर्ष काहीच द्यायचेच नाही असा अलिखित नियम असल्याप्रमाणेच शासकीय यंत्रणांचा कारभार राहिला आहे. येथील भूमिपुत्रही संघर्षाला कधीच घाबरले नाहीत. जंगल सत्याग्रह व दास्तान फाट्यावरील लढ्यात एकूण १७ जण शहीद झाले आहेत. घणसोलीमधील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साडेबारा टक्के योजना, गरजेपोटी बांधलेली घरे, विमानतळ व इतर प्रकल्पांना कडवा विरोध केला. प्रत्येक आंदोलनामध्ये शासनाला झुकावेच लागले. पण सिडको व शासनाच्या अजेंड्यावर प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य कधीच मिळाले नाही. भूमिपुत्रांचा लढा उभा करणारे दि. बा. पाटील आज नाहीत. परंतु त्यांच्या व आतापर्यंत या चळवळीसाठी रक्त सांडलेल्या शेतकऱ्यांच्या आठवणी प्रत्येकाला लढण्याचे बळ देत आहेत. कोळी युथ फाऊंडेशनने ही चळवळ पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे. उच्चविद्याविभूषित तरुण या लढ्यात सहभागी होत आहेत. चार्टर्ड अकाऊंटंट, वकील व इतर अनेक सुशिक्षित तरुणांनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. नवी मुंबईमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये छोटे - मोठे अतिक्रमण झाले आहे. परंतु सिडको फक्त प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवरच बुलडोझर फिरवत आहे. वर्षभरात ६८ बांधकामांवरील कारवाई थांबविण्यात यश आले आहे. अ‍ॅड. राहुल ठाकूर यांनी उच्च न्यायालयात चांजेमधील प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडून शंभर टक्के जमीन परत मिळविली आहे. युथ फाऊंडेशनने तीन महिने परिश्रम करून स्मार्ट व्हिलेजचा आराखडा तयार केला आहे.