शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता खारघर हिलवरही पर्यटकांना प्रवेशबंदी

By admin | Updated: June 15, 2017 03:14 IST

मोठ्या प्रमाणावर खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. पांडवकडा धबधबा, खारघर हिल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा खारघर शहरात समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : मोठ्या प्रमाणावर खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. पांडवकडा धबधबा, खारघर हिल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा खारघर शहरात समावेश असल्याने याठिकाणी वातावरण नेहमी आल्हाहदायक असते. सिमेंटच्या जंगलात अशा प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते, मात्र पावसाळ्यात खारघर शहरातील विविध पर्यटन क्षेत्रावरील बंदी ही पर्यटकांचा हिरमोड करीत असते. पांडवकडा धबधब्यावर वनविभागाने बंदी घातल्यानंतर खारघर हिलवर देखील १५ जूनपासून प्रवेशबंदीचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खारघर हिल हे खारघरमध्ये सिडकोने विकसित केलेले ठिकाण आहे. या हिलवर चाफेवाडी, फणसवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. येथे जाण्यासाठी सिडकोने डांबरी रस्ता तयार केलेला आहे. सुमारे चार-पाच किलोमीटरचा प्रवास करून खारघर हिल गाठावी लागते. या हिलवरून नवी मुंबई, मुंबई, पनवेल शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. त्यातच खारघर हिलवरील वातावरण, नैसर्गिक साधनसंपदा, दुर्मीळ पक्षी, प्राणी आदींसह याठिकाणच्या आदिवासी संस्कृतीची ओळख याठिकाणी गेल्यावर पाहावयास मिळते. खारघर, सीबीडीमधील रहिवासी जॉगिंग, मेडिटेशन, योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देखील येत असतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे सिडको जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत खारघर हिल बंद ठेवण्याचा निर्णय घेते. १५ जून ते १५ सप्टेंबर हे तीन महिने याठिकाणी प्रवेशबंदी असते. सिडकोने या सूचनेचा फलक देखील खारघर हिलच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. मात्र सिडकोच्या या धोरणामुळे पर्यटकप्रेमी नाराज आहेत. पावसाळ्यात खारघर हिलवरील हिरवळ, मान्सूननंतरचा शहरावर पसरलेली धुक्याची चादर हे दृश्य अतिशय मनमोहक असते. याठिकाणच्या बंदीमुळे पर्यटकांना या सर्व गोष्टीपासून मुकावे लागते. यासंदर्भात खारघरमधील स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या खारघर हिलमधील चाफेवाडी व फणसवाडी याचा प्रभाग क्र मांक पाचमध्ये समावेश होतो. माझ्या प्रभागातील या पर्यटन क्षेत्रात बाराही महिने पर्यटकांना प्रवेश असावा अशी सर्वांचीच भावना आहे. दरडी कोसळत असतील तर अशा ठिकाणी सिडकोने योग्य त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. या गोष्टीचा आधार घेत पर्यटकांना प्रवेशबंदी करणे योग्य नसून यासंदर्भात मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिणार असून काही अटी व शर्तीच्या आधारावर पर्यटकांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.