शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पनवेलमधील बार चालकांना नोटिसा, एक बार सील : फायर परवानगी नसलेले बार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:37 IST

मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले.

पनवेल : मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. याच धर्तीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट, तसेच हॉटेलच्या झाडाझडतीला पालिकेने सुरुवात केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहरातील लेडीज बार बंद करण्यात आले असून, एका बारला सील ठोकण्यात आले आहे.पालिका हद्दीतील रेस्टॉरंट, हॉटेलच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत ४२ हॉटेल्सचासर्व्हे करून नोटिसा पाठवल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी थेट आयुक्तांनी शहरात बारची तपासणी केली असता त्यांना फायर परवानगी न घेतलेले बार आढळून आले.जगदंबा, चाणक्य, सनी, सनसिटी, महाराजा, आर्या, सप्तगिरी या बंद पाडण्यात आलेल्या लेडीज बारची नावे आहेत.अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया फायर एनओसीसह महत्त्वाच्या परवानग्या नसल्यामुळे आयुक्त डॉ. शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात शुक्रवारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची पनवेलमधील बार मालकांनी भेट घेतली. महिनाभरात आम्ही सर्व परवानग्या घेतो तोपर्यंत आम्हाला बार सुरू करण्याची परवानगी द्या, मात्र आयुक्तांनी हा गंभीर विषय असून अशाप्रकारेबार सुरू करता येणार नसल्याचे खडे बोल बार मालकांना सुनावले.