शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

बाजार समिती पाठविणार व्यापाऱ्यास नोटीस

By admin | Updated: November 18, 2015 01:20 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये दिवाळीदिवशी आग लागली होती. संबंधित व्यापाऱ्याने विनापरवाना बदाम फोडण्याचा यंत्राचा वापर केल्यामुळे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये दिवाळीदिवशी आग लागली होती. संबंधित व्यापाऱ्याने विनापरवाना बदाम फोडण्याचा यंत्राचा वापर केल्यामुळे व शेड टाकल्यामुळे ही घटना घडली असून प्रशासन संबंधिताला कारवाईची नोटीस पाठविणार आहे. मसाला मार्केटमधील जी विंगमध्ये दिवाळीदिवशीच आग लागली होती. गाळ्यावर अनधिकृतपणे बांधलेले शेड व छतावर ठेवलेली बदाम फोडण्याची यंत्रे जळून गेली होती. अग्निशमन दलाने तत्काळ उपाययोजना केल्यामुळे आग वेळेत नियंत्रणात आणता आली होती. ज्या गाळ्यामध्ये आग लागली तो मूळ मालकाने भाड्याने दिला होता. या ठिकाणी गाळ्यात व छतावर बदाम फोडण्याची यंत्रे बसविली होती. यासाठी पालिकेची व बाजारसमितीची परवानगी घेतली नव्हती. छतावरही यंत्रे बसविली होती. फटाक्यामुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. परंतु छतावरील यंत्रामुळे शॉर्टसर्किट होवून ही घटना घडल्याचेही बोलले जात आहे. बाजार समितीमध्ये फक्त कृषी मालाचा व्यापार करता येतो. बदाम फोडण्याचा व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली नाही. या घटनेची गंभीर दखल बाजार समिती प्रशासनाने घेतली असून संबंधित व्यापाऱ्यास कारवाई करण्याची नोटीस दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)