शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची ६,५00 सोसायट्यांना नोटीस

By admin | Updated: June 26, 2016 00:51 IST

दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील जवळपास ६,५00 गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.

नवी मुंबई : दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील जवळपास ६,५00 गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच या सोसायट्यांचा कचरा उचलणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कुंड्या पाहावयास मिळत आहेत.कचऱ्याची व्यवस्थित वाहतूक व विल्हेवाट करता यावी, यादृष्टीने कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे, यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांचे विविध पातळ्यांवर प्रबोधन केले जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु त्यानंतरही अनेक सोसायट्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या अशा गृहनिर्माण सोसायट्यांना २१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. याअंतर्गत जवळपास ६,५00 सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली होती. सोसायटीत गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून दिलेल्या दोन वेगवेगळ्या कचरा कुंड्यात टाकण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक सोसायट्यांनी महापालिकेच्या या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने २२ जूनपासून अशा सोसायट्यांचा कचरा उचलण्याचे बंद केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कुंड्या दिसून येत आहेत. मागील दोन दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे. असे असले तरी अनेक सोसायट्यांनी लागलीच कार्यवाही करीत कचऱ्याचे वर्गीकरण करून संबंधित विभागाला कळविले आहे. त्यामुळे हा कचरा हलविण्याची पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या निर्देशानुसार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून द्यावे. त्यामुळे कचऱ्याची सुयोग्य पद्धतीने वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावणे सोपे होईल, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)कोपरखैरणे विभागातील ५७५ सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यातील कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांच्या कचऱ्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सोसायटीधारकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करू असे संबंधित विभागाला कळविले आहे. त्यामुळे या कचऱ्याची पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आल्याचे कोपरखैरणे विभागाचे स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद खोस यांनी सांगितले.