शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील पाच रुग्णालयांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:52 IST

सेवा न दिल्याने मेस्मा अंतर्गत कारवाई : महानगरपालिकेच्या सूचनांकडेही केले दुर्लक्ष

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्नांना सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पाच रुग्णालयांना मेस्मा अंतर्गत नोटीस देण्यात आली असून वेळ पडल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्तांनी वाशीमधील विजया नर्सिंग होम, कोपरखैरणेमधील डॉ. देठे हॉस्पिटल, सीबीडीमधील सुखदा हॉस्पिटल व ऐरोलीमधील जस्मीन हॉस्पिटल यांना मेस्मा अंतर्गत नोटीस दिली आहे. रुग्णालय सुरू ठेवण्यात आले नाही, तर बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ नुसार रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे दोन महिन्यांपासून दवाखाने बंद करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जवळपास २१६ रुग्णालये, ४०५ आयुर्वेदिक क्लिनिक, २७२ होमिओपॅथी क्लिनिक, १०० आहारतज्ज्ञ, ८१ स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून अनेकांनी रुग्णालये बंद केली आहेत. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजार झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. खाजगी रुग्णालये सेवा देत नसल्याने सर्व ताण महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांवर पडू लागला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ नुसार व महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा २०११ कलम २ प्रमाणे सर्व रुग्णालये व दवाखाने सुरू ठेवणे आवश्यक आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या