शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटांचा तपशील नाही

By admin | Updated: June 2, 2017 05:49 IST

नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांनी आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र, रायगड

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांनी आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (आरडीसी बँक) तो अद्यापही जाहीर केलेला नाही. ठेवीदारांमध्ये असलेला संभ्रम आरडीसी बँकेने दूर करावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली. अलिबाग येथील काँग्रेसच्या बॅ.अंतुले भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठीचा कांगावा करीत, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे हे चलन देशाच्या अर्थव्यवस्थेमधून बाद झाले आहे. ज्यांच्याकडे जुने चलन असेल, त्यांना ठरावीक मुदतीमध्ये बँकांमध्ये भरणा करण्याची मुभा दिली होती. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्हा बँकांचाही समावेश होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेने ३०० कोटी रु पयांच्या जुन्या नोटा असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बँकेने ६०० कोटी, नाशिक जिल्हा बँकेने ४०० कोटी, लातूर जिल्हा बँकेने २०० कोटी, परभणी जिल्हा बँकेने १०० कोटी, तर सोलापूर जिल्हा बँकेने ३०० कोटी रु पयांचे जुने चलन पडून असल्याचे जाहीर केले आहे; परंतु रायगड जिल्हा बँकेने आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील अद्यापही जाहीर केलेला नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकरी, कामगारांच्या घामाचा पैसा आरडीसी बँकेत आहे. तीच बँक त्यांच्या खातेदार-ठेवीदार यांना अंधारात ठेवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. सहकार विभागाकडे याबाबतची माहिती मागितली होती. मात्र, सहकार विभागाने माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.सध्या खरिपाच्या हंगामाला सुरु वात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाबाबतची स्थितीही बँकेने प्रसिद्ध करावी, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा बँक अडचणीत यावी, अशी आमची भूमिका नाही; परंतु जिल्हा बँकेचा कारभार असा गोपनीय का सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, संजय सावंत, ज. गो. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आरडीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.