शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीय शिवसेनेसोबत- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:34 IST

निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन

नवी मुंबई : शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही. ठाण्यामध्ये एका पक्षाने उत्तर भारतीयांना त्रास दिला, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या व्यवसायाची दुकाने तोडली, त्या वेळेस शिवसेना उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे उत्तर भारतीय समाज शिवसेनेच्या बाजूने उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक उत्तर भारतीय आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. उत्तर भारतीयांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर आकर्षण, आस्था आणि श्रद्धा आहे. कोणताही प्रसंग ओढवला तरी मदतीला सर्वात आधी धावून येणारा पक्ष शिवसेना असल्याचे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे उत्तर भारतीय समाजाबरोबर सर्वच समाज शिवसेनेबरोबर येत असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेना जात, पात, धर्म मानणारा पक्ष नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे हे सर्वांना कळले असल्याने नवी मुंबईतील सर्व समाज शिवसेनेच्या बाजूने मुख्य प्रवाहामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची पंढरपूर येथील उद्धव ठाकरे यांची विक्र मी सभा झाली. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेना करत आहे. शिवसेना सत्तेत जरी असली, तरी जेव्हा जनतेचे प्रश्न येतात तेव्हा सत्ता, सरकार बाजूला ठेवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडविते. त्यामुळे शिवसेनेची नाळ सत्तेशी नाही तर जनतेशी जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघासह ठाणे जिल्ह्यावरही निर्विवाद यश मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असावे, असे आवाहनही त्यांनी केले.निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे, असे मत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषकांनी सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आठवड्याला किमान २० कार्यक्र म घेण्यात येत असून, सुदैवाने आमच्यातील मतभेद मिटलेले असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ वाया घालविण्यापेक्षा काम केले तर येणारा काळ आपलाच असल्याचे नाहटा यांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९