शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक

By admin | Updated: May 31, 2014 01:14 IST

स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले

कल्याण : कोणतीही करवाढ नसलेले अन् कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०१४-१५ चे १५५३ कोटी ६१ लाख रुपये जमेचे आणि १५५३ कोटी ४० लाख रुपये खर्चाचे २१ लाख ५१ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले. यात उत्पन्नवाढीसाठी मोठमोठे अंदाज वर्तविले असले तरी प्रत्यक्षात हे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. एलपीजी स्मशानभूमी, प्रवेशद्वारावर स्वागत कमानींसह शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे बांधण्यासह खवय्यांसाठी फिश मार्केट बांधण्याचे गाजर अंदाजपत्रकात दाखविले आहे़ अंदाजपत्रकावर निर्णय घेण्यासाठी उद्या शनिवारी महासभा बोलाविली आहे. २०१३-१४ चे सुधारित व सन २०१४-१५ चे मूळ अंदाजपत्रक महासभेला सादर करण्यात आले. सभागृहाच्या परवानगीने माजी सभापती प्रकाश पेणकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. उत्पन्नाच्या बाबीचा विचार करता स्थानिक संस्था करातून (एलबीटी) २७१ कोटी १३ लाख, मालमत्ता करातून २७५ कोटी, पाणीपट्टीमधून ८२ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, हा अंदाज मांडताना व्यापार्‍यांची नोंदणी न होणे, मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असणे, गेल्या दोन वर्षांत पाणी बिलांची वसुली न होणे, याकडेही लक्ष वेधले आहे. त्यामुळे वास्तव पाहता उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट प्रशासन कितपत गाठेल, याबाबत साशंकता आहे. रस्ते विकासासाठी १४७ कोटी, पाणीपुरवठा २१ कोटी १२ लाख, भुयारी गटार आणि मलनि:सारणाची कामे २३ कोटी ५६ लाख, रस्त्यांवरील दिवाबत्ती ७ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यंदा प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी ५१ लाखांचा निधी देण्यात आला असून पदाधिकार्‍यांसाठी २० लाखांचा स्वतंत्र निधी देणार आहे. याचबरोबर उद्याने व तलाव सुशोभीकरणासाठी १३ कोटी ६२ लाख, खेळाची मैदाने आणि क्रीडांगणे ४ कोटी ४० लाख, मंडई उभारणे ६ कोटी, रुग्णालये व दवाखाने सेवा ५ कोटी ९१ लाखांची तरतूद यंदा केली आहे. प्रशासन नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप परिवहन उपक्रमाकडून केला जातो़ या वेळी त्यांना १० कोटी ७५ लाखांचा निधी दिला आहे. (प्रतिनिधी)