शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरण न के ल्यास कचरा उचलणार नाही : पनवेल आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:55 IST

पालिका हद्दीत ज्या सोसायट्यांमधून १०० किलोपेक्षा जास्त कचरा निघत असेल अशा सोसायट्या कचºयाचे वर्गीकरण करत नसतील तर १ डिसेंबरला पालिका हद्दीतील सिडको नोडमधील देखील कचरा उचलला जाणार नाही.

पनवेल : पालिका हद्दीत ज्या सोसायट्यांमधून १०० किलोपेक्षा जास्त कचरा निघत असेल अशा सोसायट्या कचºयाचे वर्गीकरण करत नसतील तर १ डिसेंबरला पालिका हद्दीतील सिडको नोडमधील देखील कचरा उचलला जाणार नाही. विशेष म्हणजे कचºयाचे वर्गीकरण करण्यासंदर्भात ज्या सोसायट्या उत्तम कामगिरी बजावतील अशा सोसायट्यांना स्पर्धेत सहभागी करून त्यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल, असे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यावेळी सांगितले.घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ संदर्भात महत्त्वाची बैठक बुधवारी आद्यक्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त, महापौर, सभागृह नेते, सभापती, पालिका हद्दीतील रहिवासी, शिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी २०१७ च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणासंदर्भात माहिती आयुक्तांनी उपस्थितांना दिली. १८ नोव्हेंबरला पार पडणाºया महासभेत सत्ताधाºयांनी यासंदर्भात चर्चा करावी असे सांगताच सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, बाविस्कर यांनी विरोधकांना आम्ही कचºयाच्या विषयासंदर्भात बोलत असल्याचे सांगत तुम्ही आम्हाला शिकवू नका असे सांगताच शेकाप नगरसेवक पापा पटेल, हरेश केणी, प्रमोद भगत यांनी सत्ताधात्तयांना धारेवर धरण्यास सुरु वात केली. विशेष म्हणजे नागरिकांच्या उपस्थितीत सत्ताधारी- विरोधक सभागृह सुरू असल्याप्रमाणे भांडत बसल्याने शेवटी आयुक्तांनी मध्यस्थी करत सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना सुनावले. तुम्हाला कोणत्याही विषयावर बोलायचे असल्यास माझ्याशी कार्यालयात येऊन वैयक्तिक बोला असे सांगत असताना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. आम्ही त्यांच्याच प्रश्नावर बोलत असल्याचे सांगितले.यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत, आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक हरेश केणी, गुरु नाथ गायकर उपस्थित होते.नगरसेवकांची अनुपस्थितीपनवेल महानगर पालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या सभेत प्लॅस्टिक पिशव्या बंदी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत सर्वेक्षण या विषयावर चर्चा झाली. मात्र ८३ पैकी केवळ २० नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांना हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला नसल्याचे दिसून आले. खारघरमधील १३ पैकी केवळ दोन नगरसेवक या कार्यक्र माला उपस्थित होते.