शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग क्र मांक १७ च्या रचनेबाबत हरकत दाखल

By admin | Updated: April 26, 2017 00:32 IST

पनवेल महानगरपालिकेकरिता २४ मे रोजी मतदान होणार आहे. असे असतानाही प्रभाग क्र मांक १७ च्या रचनेबाबत भाजपाचे इच्छुक उमेदवार

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेकरिता २४ मे रोजी मतदान होणार आहे. असे असतानाही प्रभाग क्र मांक १७ च्या रचनेबाबत भाजपाचे इच्छुक उमेदवार अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात अपील केले आहे. रेल्वेस्थानकाच्या पलीकडील झोपडपट्ट्या वगळाव्यात याकरिता भुजबळ आकांडतांडव करीत आहेत. यावरून भाजपावाले झोपडपट्टीवासीयांच्या विरोधात असल्याचा आरोप शेकापचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे. २४ मे रोजी येथील मतदार संबंधितांना मतपेटीत उत्तर देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर भौगोलिक सलगता नसल्याने आम्ही हरकत घेतली असल्याचे भाजपावाल्यांचे म्हणणे आहे.काही खासगी सोसायट्याही या प्रभागात आहेत. रेल्वेस्थानकाच्या पलीकडील भाग म्हणजे तक्का परिसराचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. पंचशीलनगर, नवनाथनगर, इंदिरानगर, मालधक्का या महत्त्वाच्या झोपडपट्ट्या या प्रभागात येतात. रेल्वेस्थानकाचा पूर्व आणि पश्चिम परिसर प्रभाग क्र मांक १७ ला जोडण्यात आलेला आहे. भौगोलिक सलगतेचा मुद्दा उपस्थित करून या प्रभागाच्या रचनेवर भाजपाचे इच्छुक उमेदवार अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी हरकत घेतली होती. मात्र आयुक्तांनी ती फेटाळली त्यामुळे भुजबळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी हा मुद्दा टिकला नाही. त्यामुळे त्यांनी या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात अपील केले आहे. त्याबाबत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाणार आहे. झोपडपट्टी परिसरात माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा प्रभाव आहे. गेली वीस वर्षे नगरसेवक असल्याने त्यांचा दांडगा संपर्क या भागात आहे. त्यामुळे पाटील यांच्याकरिता रेल्वेस्थानकाच्या पलीकडील भाग फायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली नाही. (वार्ताहर)