शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खारघर टेकडीवर ‘नो एंट्री’

By admin | Updated: June 29, 2015 04:11 IST

पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते.

पनवेल : पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे. मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी या गावांना यामधून सूट असणार आहे. नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सिडकोने याठिकाणी जाण्यासाठी डांबरी रोड केले आहेत. शहरामधील अनेक नागरिक याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने याठिकाणी सहा सुरक्षारक्षक देखील नेमले आहेत. मात्र काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षारक्षकांना न जुमानता टेकडीवर प्रवेश करीत असतात, अशा पर्यटकांना रोखण्यासाठी खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने याठिकाणी दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. शनिवारी, रविवारी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. तरु णांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र पर्यटकांनी याठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोचे खारघरमधील प्रशासक प्रदीप डहाके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)