शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आओ जाओ घर तुम्हारा! बस स्थानक, पालिका हद्द, रेल्वे स्थानकात कोठेच तपासणी नाही; सांगा कोरोना रोखणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 08:09 IST

पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.

वैभव गायकर - पनवेल : पनवेलमध्ये बुधवार, १७ मार्च रोजी २१२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पनवेलमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पालिका क्षेत्रात विद्यमान रुग्णांचा आकडा १११० वर पोहोचला आहे. एकूण रुग्णांचा आकडा ३१,८८६ वर पोहोचला असून यापैकी  ३०,१२० रुग्ण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा ६५६ वर पोहोचला आहे. पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. विशेष म्हणजे पालिका परिसरात रात्रीची संचारबंदी पुकारली असतानादेखील पालिका प्रशासन असो अथवा पोलीस प्रशासन कोणाचे कशावरच नियंत्रण नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती पालिका हद्दीत निर्माण झाली आहे. 

बस स्थानक मुंबई उपनगर, घाटमाथ्यावरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही. पनवेल शहरात एसटी बसचे मोठे आगार आहे. या ठिकाणी मुंबई उपनगर, कोंकण तसेच घाटमाथ्यावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दररोज हजारो प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करीत असतात; मात्र कोणाचीच तपासणी केली जात नाही. शेकडो गाड्या बस आगारातून सुटत असतात. प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नसून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केली जात नाही. 

रेल्वे स्थानकपनवेल रेल्वे स्थानकावर मुंबई, कोंकण तसेच परराज्यातील ट्रेन्स काही वेळा थांबत असतात. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने परराज्यातील मजूर वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित झालेला मजूर वर्ग पुन्हा एकदा राज्यात येत आहे. रोज भरभरून ट्रेन राज्यात येत असताना अशा प्रवाशांना क्वारंटाईन न करता थेट प्रवेश दिला जात आहे.

पालिका सीमापालिका सीमेचीदेखील अशीच परिस्थिती आहे. खारघर ते पळस्पे फाट्यापर्यंत काही ठिकाणी पोलीस तैनात केलेले आहेत. मात्र, प्रवाशांची कोणतीही माहिती घेतली जात नाही. विशेष म्हणजे पालिका हद्दीत रात्रीच्या वेळेला संचारबंदी असताना सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते. वाहनांची  अडवणूक केली जात नाही तर प्रवाशांची तपासणी ही लांबची गोष्ट आहे. प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, यासंदर्भात पालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. याकरिता पोलिसांना पालिका प्रशासन मनुष्यबळ पुरविणार आहे.     - धैर्यशील जाधव (साहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल