शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!; शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:38 IST

शाळेच्या बॅगेत आता सॅनिटायझर वाढले

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल तालुक्यात ५वी ते ८वीपर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून  सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या  नियमांचे पालन करीत जिल्हा परिषद,  महापालिका शाळा आणि काही प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. तर काही शाळा अद्याप बंद आहेत. जनजागृतीमुळे विद्यार्थी शाळेत जाताना, “चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे,” असा हट्ट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या  बॅगेत आता  सॅनिटायझरची बाटली  दिसत आहे. पनवेल तालुक्यात ५वी ते ८वीपर्यंतच्या ४१७ शाळा आहेत. तर ७२ हजार ४५३ विद्यार्थी संख्या आहे. २७ जानेवारीपासून शाळा  सुरू करण्याचे आदेश असले तरी पनवेल तालुक्यातील बहुतांश  शाळा अद्याप बंदच आहेत.  तर काही खासगी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. सुरू झालेल्या शाळांकडून कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझर, वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याची व्यवस्था या सर्व बाबी शाळेकडून करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सॅनिटायझरचाही वापर करण्यात येत आहे.  यामुळे विद्यार्थ्यांच्या बॅगेत सॅनिटायझरच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिक्षकांच्या  सांगण्यावरून  पालकांकडे सॅनिटायझर घेऊन देण्याबाबत हट्ट धरत आहेत. त्यानुसार पालकसुद्धा काळजीपोटी सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एकही बाधित नाही पनवेल तालुक्यातील शाळा सुरू झाल्यापासून एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झाला  नसल्याची  माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शाळेतील सर्व वर्ग कोरोना नियमांचे पालन करूनच भरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी शाळांकडून घेतली जात आहे. विद्यार्थी म्हणतात…. आमच्या वर्गात ४० विद्यार्थी आहेत. पण, सध्या २२ विद्यार्थी येत आहेत. आम्ही एका बाकावर एकच जण बसतो. शाळेत ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. तरीपण मीही सॅनिटायझरची बाटली सोबत घेऊन जातो. वेदांत पवार,  विद्यार्थी 

मास्क, हात धुणे, सॅनिटायझर वापरण्यासाठी  शिक्षकांकडून वारंवार सूचना करण्यात  येतात. त्यामुळे मीही मास्कचा वापर करतो तर बाबांकडून सॅनिटायझर मागून घेतले आहे. त्याचा वापर मी शाळेत करीत आहे. चॉकलेट  मला आवडते; पण, या वेळी सॅनिटायझरसाठी पप्पांना सांगितले होते. - सिद्धांत यादव, विद्यार्थी 

शाळा सुरू झाल्या आहेत. मास्कचा वापर तसेच एका बाकावर एकाच विद्यार्थ्यास बसविले जात आहे. मध्यंतरी  सुट्टीत तसेच इतर वेळा सॅनिटायझरचा वापर मी करतो आहे. त्यासाठी वडिलांकडून सॅनिटायझरची  बाटली मागून घेतली आहे.      - संकेत जाधव,  विद्यार्थी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या