शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

तोटा सहन करून एनएमएमटीची प्रवाशांना सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:11 IST

पहिल्या लॉकडाऊनपासून सहापट उत्पन्न घटल्यानंतरही उपक्रमाच्या वतीने अविरत सेवा सुरू आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसेस प्रवाशांच्या सुविधेसाठी रोडवर धावत आहेत. प्रतिदिन ५० ते ६० हजार प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत ३९ हजार ७४६ परप्रांतीयांना घरापासून रेल्वे स्टेशन व पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य केले आहे. पहिल्या लॉकडाऊनपासून सहापट उत्पन्न घटल्यानंतरही उपक्रमाच्या वतीने अविरत सेवा सुरू आहे.मुंबई व उपनगरांची लाइफलाइन समजली जाणारी रेल्वेसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून ठप्प झाली. शासनाने पहिला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरापासून कामाच्या ठिकाणी घेऊन कसे जायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवली तरी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उप्रकमाने २५ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ११२ बसेस उपलब्ध करून दिल्या. या बसेसच्या दिवसभर ३९८ फेºयांच्या माध्यमातून सरासरी प्रतिदिन २० हजार ४०० किलोमीटर अंतर धावण्यास सुरुवात केली. पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी, सरकारी, निमसरकारी, मेडिकल, किराणा दुकान व इतर अत्यावश्यक सेवेतील ८ ते १० हजार कर्मचाºयांना घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी एनएमएमटीमुळे आधार मिळाला.शासनाने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली. ५ मेपासून सीबीडी, एनआरआय, नेरूळ, सानपाडा, तुर्भे, तुर्भे एमआयडीसी, एपीएमसी, वाशी, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी, डीसीपी कार्यालय, उरण, जासई, न्हावाशेवा, शेडुंग, मुंब्रा परिसरातील तब्बल ३९ हजार ७४६ प्रवाशांना सेवा दिली आहे. पूर्वी एनएमएमटीला प्रतिदिन ३८ लाख रुपये उत्पन्न होत होते.कोरोनामुळे त्यामध्ये घट होऊन ते सहा लाख रुपयांवर आले आहे. उपक्रमाला इंधनासाठी महिन्याला २ कोटी व वेतनासाठी ७ कोटी २० लाख रुपये खर्च होत आहेत. कोरोनाच्या काळात उपक्रमाचा मासिक तोटा ६ कोटींवरून ११ ते १२ कोटींवर गेला असून, तो सहन करूनही प्रवाशांसाठी सेवा सुरू ठेवली आहे.।रुग्णवाहिकेसाठीही बसेसचा वापरकोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांना घरापासून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी पडू लागली. अनेक खासगी रुग्णवाहिकांनी सेवा बंद केल्यामुळे व मनपाकडील रुग्णवाहिका अपुºया पडू लागल्यानंतर, एनएमएमटी बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत १८ बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले असून, अजून १० बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले जाणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेत सेवा देणे शक्य होऊ लागले आहे.>कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर एनएमएमटी बसेसच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली. चालक व वाहकांना मास्क, हातमोजे, सॅनेटायझर उपलब्ध करून दिले. एनएमएमटी बसेस नियमित सुरू राहतील व चांगल्या सुविधा देता येतील, यावर विशेष लक्ष देण्यात आले व सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत अखंडपणे सेवा देणे शक्य झाले.- शिरीष आरदवाड,व्यवस्थापक, एनएमएमटी