शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

एनएमएमटीचे बसथांबे गॅरेजला आंदण, वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 05:00 IST

कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळच एनएमएमटीचा बस थांबा आहे.

नवी मुंबई : बेकायदा पार्किंगमुळे शहरवासीय अगोदरच हैराण झाले आहेत. वाहतूककोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. आता यातच वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजचालकांनी चक्क रस्त्यांवरच आपली दुकाने थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. काही भागात तर एनएमएमटीच्या बसथांब्यासमोरच वाहने उभी करून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने बसचालकांसह प्रवाशांची मोठी कसरत होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.नवी मुंबईत वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. रस्त्यावर दुतर्फा उभ्या असणाºया वाहनांमुळे परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते दुतर्फा वाहन पार्किंगमुळे आणखी निमुळते झाले आहेत. त्यामुळे एनएमएमटीसह स्कूल बसेसना अशा रस्त्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रुग्णवाहिकांचा तर अनेकदा खोळंबा झाल्याची उदाहरणे आहेत. रस्त्यांवरील दुतर्फा वाहन पार्किंग त्रासाचे ठरत असतानाच आता एनएमएमटीच्या बसथांब्यासमोर अगदी रस्त्यावर थाटलेल्या वाहन दुरुस्तीच्या बेकायदा व्यवसायाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढविली आहे. शहरवासीयांना एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा, यादृष्टीने परिवहन उपक्रमाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार अनेक भागात गरजेनुसार एनएमएमटीच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे बस थांबे उभारले आहेत. मात्र, आता हेच बस थांबे अनधिकृत गॅरेज व्यावसायिकांना आंदण ठरू लागले आहेत.कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळच एनएमएमटीचा बस थांबा आहे. या बसथांब्यावर नेहमीच रिक्षांच्या दुरुस्ती सुरू आहेत. समोरच गॅरेज असल्याने येथील कारागीर सर्रासपणे बस थांब्याच्या समोर रिक्षा उभ्या करून दुरुस्तीची कामे करतात. एका वेळी चार ते पाच रिक्षा उभ्या असतात. तसेच याच रस्त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाही रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. रिक्षांच्या दुरुस्तीचे काम अगदी बसथांब्याच्या समोरच केले जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. तसेच बसचालकांनाही बस थांब्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्याच्या मधोमध बस उभी करावी लागते. अशा परिस्थितीत बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो.मागील दहा वर्षांत कोपरखैरणे नोडचा झपाट्याने विकास झाला आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. विशेषत: या परिसरात मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. डी-मार्ट चौकातून सेक्टर २३ मार्गे पुढे जीमी टॉवरपासून तीन टाकीकडे जाणाºया चौकानात नागरी वसाहत मोठी आहे. या वसाहतींना जोडण्यासाठी एनएमएमटीने या मार्गावर विशेष बसेस सुरू केल्या आहेत. मागील काही वर्षांत बसेसच्या फेऱ्यांत वाढही करण्यात आली आहे. डी-मार्ट ते तीन टाकी या चौकोणी मार्गावर यशवंतराव चव्हाण विद्यालय, इंदिरा गांधी अभियांत्रिकी कॉलेज, वेदान्त हॉस्पिटल, महापालिकेचे माता बाल संगोपन केंद्र, ज्ञानविकास हायस्कूल तसेच हॉटेल्स रेस्टॉरेंट, बँका आणि राज्य उपनिबंधक कार्यालय आदीचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दुतर्फा पार्किंग आणि बसथांब्यासमोर रिक्षा दुरुस्तीचा बेकायदा व्यवसाय आदीमुळे या संपूर्ण पट्ट्यात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूककोंडी झालेली असते. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे.महानगरपालिकेसह एनएमएमटीची चुप्पीएनएमएमटीचे बसथांबे गॅरेजचालकांनी बळकावले आहेत. कारवाईचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सर्रासपणे बसथांब्याच्या समोरच वाहनांना जॅक लावून दुरुस्तीची कामे केली जातात.कोपरखैरणेसह बोनकोडे येथील बालाजी टॉवर्सच्या समोरील थांब्यावरही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. कोपरखैरणेसह शहरातील अनेक बसथांबे गॅरेजचालकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात महापालिकेसह एनएमएमटीचे व्यवस्थापन आणि वाहतूक विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, या तिन्ही विभागाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई