शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या वातानुकूलित प्रवासभाड्यात २५ टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:15 IST

एनएमएमटीने आपल्या ताफ्यातील वातानुकूलित बसचा प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त केला आहे. तर सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किरकोळ स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबई : एनएमएमटीने आपल्या ताफ्यातील वातानुकूलित बसचा प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त केला आहे. तर सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किरकोळ स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे. या सुधारित तिकीट दराला मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंजुरी दिल्याने ७ फेब्रुवारीपासून हे दर प्रत्यक्ष लागू होणार आहेत.नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा विविध कारणांमुळे तोट्यात आहे. यातच ओला, उबेर टॅक्सींमुळे फायद्यात असलेल्या एनएमएमटीच्या वातानुकूलित बसच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अधिकाधिक प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळावेत, यादृ्ष्टीने या वर्षीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले. त्यापैकी वातानुकूलित बसेसचे तिकीट दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसाधारण बसेसच्या पहिल्या १२ टप्प्यांनंतर प्रत्येक टप्प्यासाठी १ ते २ रुपयांची किरकोळ वाढ सूचित करण्यात आली आहे. या सुधारित तिकीट दराला राज्य शासनाच्या संबंधित विभागाची नुकतीच मंजुरी मिळाली असून बुधवारपासून हे दर प्रत्यक्षात लागू केले जाणार असल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. वातानुकूलित आणि साध्या बसच्या प्रवासासाठी परतीचे तिकीट घेतल्यास त्यात १0 टक्के सूट मिळेल. हे तिकीट रात्री १२ वाजेपर्यंत ग्राह्य राहील. महापालिका शाळेतील गणवेशधारी विद्यार्थ्यांना परिवहनच्या साध्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिलेली आहे.