शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या ताफ्यात २० नव्या गाड्या दाखल

By admin | Updated: April 6, 2016 04:24 IST

महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या २० मिडी बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळालेल्या आहेत.

नवी मुंबई : महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या २० मिडी बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळालेल्या आहेत. लवकरच या बस विविध मार्गांवर सुरू करून ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद अनुभव देण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे.नवी मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी एनएमएमटी प्रशासन सातत्याने प्रयत्नात आहे. त्याकरिता विभागांतर्गतच्या मार्गावर रिंग रूट बससेवा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु सद्य:स्थितीत शहरातल्या विविध मार्गांवर धावणाऱ्या एनएमएमटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त स्थितीतल्या असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बहुतांश गाड्यांचे मार्ग फलक तुटलेले असून बसमधील आसन व्यवस्थाही डबघाईला आलेली आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या बसमधून क्षमतेपेक्षाही जादा प्रवाशांची वाहतूक होत असल्याने त्या बस एकाच बाजूला झुकल्याचे पाहायला मिळते. यामुळे परिवहनच्या गाड्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी तिकीटदर कमी असूनही अनेक प्रवासी एनएमएमटीने प्रवास करण्याला टाळाटाळ करतात. परिवहनतर्फे नुकताच बस डे देखील साजरा करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रवाशांचा एनएमएमटीला अल्प प्रतिसाद लाभला होता.परंतु ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद देण्याचा प्रयत्न एनएमएमटीचा आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात २० नव्या बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळाल्या आहेत. घणसोली येथील आगारात गेल्या चार दिवसांपासून या बस उभ्या आहेत. आरटीओकडून त्यांचे पासिंग होऊन नंबर मिळणे अद्याप बाकी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या बस विविध मार्गांवर सुरू केल्या जातील, असे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले. परिवहनतर्फे अद्याप कोणताही नवा मार्ग विचाराधीन नसल्याने सध्याच्या मार्गावरील जुन्या गाड्यांऐवजी नव्या गाड्या धावणार आहेत. परंतु आरटीओच्या प्रक्रियेला अद्याप १० ते १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याने त्यानंतरच या नव्या गाड्यांमध्ये बसण्याचा आनंद नवी मुंबईकरांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)