शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांसाठी नववीच्या विद्यार्थ्यांची शोधाशोध

By admin | Updated: June 18, 2017 02:10 IST

यंदा इयत्ता नववीच्या अभ्यासक्र मात बदल झाला आहे. शाळा आणि पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध होण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : यंदा इयत्ता नववीच्या अभ्यासक्र मात बदल झाला आहे. शाळा आणि पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध होण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्र म शिकवावा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दरम्यान, खारघरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे. २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने नव्या अभ्यासक्र माची पुस्तके जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीच्या संचालकांनी मे महिन्यात शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. पालकवर्ग दोन दिवसांपासून परिसरातील सर्व पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तकांसाठी शोधाशोध करीत आहेत. अद्याप बाजारातच पुस्तके उपलब्ध झाली नसल्याने खारघरमधील दोन पुस्तकविक्रेत्यांच्या दुकानात चौकशी केली असता पुस्तक यायला एक आठवडा लागेल, असे सांगण्यात आले. शाळा सुरू झाल्या; परंतु पुस्तकविक्रे त्यांकडे पुस्तके उपब्लध नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी रामचंद्र देवरे, आप्पा वारंग, संतोष गुजर, सुमित निगडे आणि सचिन महाडिक आदी शिष्टमंडळाने, पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे. पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना काय शिकवावे अणि नेमका कसला अभ्यास करावा, असा प्रश्न शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना पडला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व वर्गांतील पुस्तके वितरण करण्यात आली आहेत. नववीची पुस्तके अद्यापही उपलब्ध झाली नाहीत. लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- नवनाथ साबळे, गटशिक्षणाधिकारी, पनवेल विभाग