शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नाईक समर्थकांनी केले शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 02:34 IST

कार्यालयात पदाधिकाऱ्यांची गर्दी : सोबत कोण आहे आजमावण्याचा प्रयत्न; भाजपमध्ये जाण्याचा केला ठराव

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांनी पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर शहरात शक्तिप्रदर्शन केले. ठाणे-बेलापूर रोडवरील कार्यालयामध्ये दोन हजारपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सोबत कोण आहे व विरोधात कोण जाणार हे आजमावण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत भाजपात जाण्याचा ठराव करून तो एकमताने मंजूर करून घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे नाईक समर्थकांनी सोमवारी स्पष्ट केले होते. नगरसेवक व पदाधिकाºयांनी मंगळवारी व्हाइट हाउस कार्यालयामध्ये जाऊन गणेश नाईक यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. याविषयी संदेश मोबाइलवरून सर्व पदाधिकाºयांना सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी पाठविण्यात आले होते. गणेश नाईक यांना भाजपात जाण्यासाठी विनंती करण्यासाठी जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्षांतर करताना कोण सोबत आहे व कोण विरोधात जाणार हे आजमावण्यासाठीचा हा प्रयत्न होता. कार्यालयामध्ये कोणते नगरसेवक व पदाधिकारी आले याची माहिती घेतली जात होती. न आलेल्या पदाधिकाºयांना सहकारी फोन करून का आला नाहीत, याविषयी विचारणा केली जात होती. कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकाºयांनी शहराच्या विकासासाठी भाजपमध्ये जावे, अशी मागणी केली. भाजपमध्ये जाण्यासाठी ठराव करून एकमुखाने सहमती घेण्यात आली.नगरसेवक व प्रमुख पदाधिकाºयांनी कार्यालयात गर्दी केल्यानंतर गणेश नाईक स्वत: सर्वांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु शेवटपर्यंत नाईक परिवारातील कोणीही कार्यकर्त्यांसमोर येऊन मनोगत व्यक्त केले नाही. यामुळे काही पदाधिकाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दिवसभर शहरात नाईकांच्या पक्षांतराचीच चर्चा सुरू होती. सोबत कोण जाणार व राष्ट्रवादीमध्ये कोण राहणार याकडे सर्वपक्षीयांचे नेते लक्ष ठेवून होते.पालिकेच्या स्थापनेपासून नाईक यांच्या पुढाकाराने शहराचा विकास झाला आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लागण्यासाठी प्रवाहाबरोबर जाणे योग्य असून याबाबत नगरसेवकांचे एकमत झाले आहे. याबाबत नाईक यांना विनंती करण्यात आली असून नाईक जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.- अनंत सुतार,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, नवी मुंबईनवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेत गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. साडेचार वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करताना गळचेपी होत आहे. शहराच्या विकासासाठी पक्ष बदलण्याची नगरसेवकांच्या माध्यमातून नाईक यांना विनंती करण्यात आली असून लवकरच भूमिका स्पष्ट होईल.- रवींद्र इथापे, सभागृह नेतादेशात ज्याप्रमाणे वारे वाहत आहे त्याप्रमाणे आपल्यालाही जावे लागेल, प्रवाहाच्या विरोधात जाऊन चालणार नाही. यापूर्वीही आम्ही गणेश नाईकांच्या मागे होतो आणि यापुढेही राहणार आहोत.- सुधाकर सोनावणे, माजी महापौरशरद पवारांची साथ सोडायची नाही, असे नाईक यांचे मत आहे; परंतु शहर आणि कार्यकर्ते हे नाईक यांचा वीक पॉइंट असून, प्रवाहासोबत जावे अशी नगरसेवकांनी मागणी आहे. त्यांचा निरोप नाईक यांना पोहोेचविण्यात आला असून लवकर दिशा समजेल.- सूरज पाटील,युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई