शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको अग्निशमन दलात नवीन भरती

By admin | Updated: November 25, 2015 02:02 IST

संपूर्ण वसाहतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या सिडको अग्निशमन दलातील तरूणांची कायमस्वरूपी भरती करण्यात आली आहे

कळंबोली: संपूर्ण वसाहतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या सिडको अग्निशमन दलातील तरूणांची कायमस्वरूपी भरती करण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळात वाढ झाली असून अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. आगामी काळात त्यामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस या दलाचा आहे. त्यामुळे वसाहतीत लागलेल्या आगीचा सामना सहज करता येणार आहे.पनवेल परिसरात नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, द्रोणागिरी या सिडको वसाहती आहेत. आता उलवे, तळोजा, नावडे, करंजाडे या ठिकाणी नवीन वसाहती उभारण्यात येत आहेत. या वसाहतीत टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर सिडको नोडमध्ये वेगवेगळया वस्तुचे दुकाने, शोरूम, शाळा, महाविद्यालय, उपहारगृह रूग्णालयांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त बाजूला तळोजा, पाताळगंगा एमआयडीसी, ओएनसी, जेएनपीटी सारखे शासकीय उपक्र म आहेत. त्याचबरोबर पनवेल परिसरातून पनवेल-सायन द्रुतगती, मुंबई- पुणे, मुंबई- गोवा, मुंब्रा हे महत्वपूर्ण महामार्ग जातात. वाढते दळणवळण, औद्योगीक आणि नागरीकरणामुळे आग लागणे, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. परिणामी सिडको अग्निशमन दलाच्या जवानाना सतत तत्पर राहावे लागते. कॉल आला की काही मिनिटात त्यांनी घटनास्थळी पोहचणे क्र मप्राप्त असते. ठाणे, रायगड जिल्ह्याच्या हद्दीत एखादी मोठी आगीची घटना घडली तर त्या ठिकाणीही सिडकोवाल्यांना मदतीसाठी जावे लागते.नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी या ठिकाणीच्या अग्निशमन केंद्रावर प्रचंड ताण असतो. असे असतानाही या ठिकाणी अतिशय कमी मनुष्यबळ होतो. त्यामध्ये कंत्राटी कामगारांची संख्या सर्वाधिक होती. म्हणजे एकूण ६ फायरमन कायमस्वरूपी होते. बाकी कंत्राटी कामगारांनीच इतकी वर्ष फायर फायटिंगचे काम केले. केंद्र अधिकारी ३, सहाय्यक अधिकारी ३,फायरमन ४३, लिडिंग फायरमन ८, वाहनचालक १६, असे एकूण ७३ इतकी संख्या होत आहे. ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांनी जीवित आणि वित्तीय हानी टाळली आहे. ही संख्या उपलब्ध लोकसंख्येच्या तुलनेत कमी होती म्हणून सिडकोने २८ आॅगस्टला जाहीर प्रसिध्द करून रिक्त पद भरण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन उमेदवारांना केले. १३ सप्टेंबरला नवीन उमेदवारांची परीक्षा सुध्दा घेण्यात आली. त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची सिडकोने कायमस्वरूपी भरती केली आहे. एकूण चार अग्निशमन केंद्रात ६० जणांची नव्याने भरती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहेच त्याचबरोबर चारही ठिकाणी विभागानी करण्यात आली आहे. (वार्ताहर)