शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेल, खांदा वसाहतीत गाठीभेटींवर भर

By admin | Updated: April 27, 2017 00:09 IST

पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आता एक महिना सुध्दा उरलेला नाही, असे असताना अद्याप

कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आता एक महिना सुध्दा उरलेला नाही, असे असताना अद्याप काही पक्षांचे उमेदवार ठरलेले नाहीत. मात्र शेतकरी कामगार पक्षाने नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत आपला प्रचार सुरू केला आहे. मतदारांच्या गाठीभेटींबरोबरच त्यांच्यापर्यंत परिचय पत्रक सुध्दा पोहचविण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाकडे जवळपास तीनशे जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर शिवसेनेबरोबर युती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे उमेदवार ठरलेले नाहीत. काही जणांचे तिकीट फिक्स असले तरी त्यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. तीच अवस्था शिवसेनेची आहे. पक्षप्रमुखांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे आदेश दिले असतानाही काही स्थानिक नेते भाजपाबरोबर घरोबा करण्यासाठी या ना त्या मार्गाने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षाबरोबर निवडणूक लढणार आहे. परंतु त्यांच्यामध्ये नेमका कोणाला किती आणि कोणत्या जागा याबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेस मोठा पक्ष असल्याने उमेदवारीबाबत प्रदेश कार्यालयातून ग्रीन सिग्नल घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बहुतांशी इच्छुकांमधील पत्ता कट होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्वात शेतकरी कामगार पक्षाने उजवे राजकारण सुरू केले आहे. त्यांची जवळपास बरेचशा उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत. त्यामुळे ते उमेदवार आपल्या प्रभागात आता प्रचार करू लागले आहेत. विशेष करून खांदा वसाहतीत म्हणजे प्रभाग क्र मांक १५ मध्ये माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, विजय काळे यांच्या मातोश्री कुसुम काळे आणि मोहन गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. परिचय पत्रक छापून ते डोअर टू डोअर मतदारांच्या भेटीला पाठविण्यात आलेली आहेत. दुसरीकडे या प्रभागात भाजपाचे उमेदवार ठरलेले नाहीत त्यामुळे शांतता आहे. परंतु पक्षांतर्गत तिकिटासाठी चुरस सुरू आहे. प्रभाग क्र मांक १७ मध्ये माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि शिवानी घरत यांची प्रचारफेरी सुरू झालेली आहे. हे उमेदवार थेट मतदारांच्या भेटीला जात आहे. याच प्रभागात भाजपाकडून अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनी इच्छुक म्हणून प्रचार सुरू केला आहे. (वार्ताहर)