शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:04 IST

महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

- वैभव गायकरपनवेल : लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवसांपासून घरी बसलेले ग्राहक वाढीव वीजबिलांना कंटाळले आहेत. अनेकांचे वीजबिल काही महिन्यांपासून थकीत असताना, अशा ग्राहकांची माहिती काढून या ग्राहकांना महावितरणच्या कारवाईची भीती दाखवून लुबाडणारी टोळी पनवेलमध्ये सक्रिय झाली आहे. महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.नवीन पनवेलमधील एका वीज ग्राहकाला थकीत वीजबिल, तसेच विजेचा वापर वाढल्याचे कारण सांगत, त्याच्याकडून लाखो रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात येईल, अशी भीती दाखविली. महावितरणचे नाव सांगत, एका भामट्याने हा प्रकार केल्याचे या ग्राहकाला महावितरण कार्यालयात धाव घेतल्यावर निदर्शनास आले. या ग्राहकाचे वीजमीटरही संबंधित इसम घेऊन गेल्याचा प्रकार महावितरण अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर उघड झाला.एकीकडे वाढीव बिलांमध्ये हैराण झालेल्या नागरिकांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. पनवेलमध्ये लाखो महावितरणचे ग्राहक आहेत. वाढीव वीजबिलामुळे अनेकांनी आपले वीजबिल भरलेले नाही. वाढीव बिलासंदर्भात महावितरणच्या विभागीय कार्यालयावरही नागरिकांनी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. वाढीव बिलातून शासनामार्फत दिलासा मिळेल, असा नागरिकांचा समज आहे. मागील काही महिन्यांपासून बिल न भरलेल्या नागरिकांना जाब विचारून त्यांची लुबाडणूक होत असल्याचे या प्रकारामधून उघड झाले आहे.महावितरणच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात एकही ग्राहकाची वीजजोडणी खंडित केलेली नाही, अथवा ग्राहकांच्या घरात भेट देत मीटर चेकिंग केले गेलेले नाही. खोटी कारणे सांगून ग्राहकांना धमकावले जात असल्यास संबंधित इसमाकडून ओळखपत्राची मागणी करावी व महावितरणकडे या संदर्भात तत्काळ तक्रार करावी.- जयदीप नानोटे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पनवेल शहर उपविभाग महावितरण

टॅग्स :panvelपनवेल