शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

नवी मुंबईत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 02:05 IST

नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका कार्यालये, सिडको, कोकण भवन, शाळा, सोसायट्या, महाविद्यालये आदी सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महापौर जयवंत सुतार यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले.देशातील वास्तुरचनेचा आकर्षक नमुना असलेल्या आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात तळमजल्यावर महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या वेळी महापौर सुतार यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाºया व बलिदान देणाºया हुतात्म्यांचे स्मरण करून आपल्या देशाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काम करायला हवे असे सांगत नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये राज्यात नेहमीच अव्वल राहिली असून यापुढील काळात अधिक चांगले काम करून देशातही नंबर वन होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण अशा काही भागात पूर स्थितीमुळे नागरिक संकटात असल्याने त्यांना मदतीचा हात देण्याचे काम आपण सर्व मिळून करू या, असे आवाहन महापौरांनी केले.या वेळी स्वच्छ व प्लॅस्टिक थर्माकोलमुक्त नवी मुंबईची सामूहिक शपथ घेण्यात आली. या वेळी अंकुर सामाजिक संस्थेमार्फत शाळांमध्ये राबविण्यात येणाºया प्लॅस्टिमॅन उपक्रमांतर्गत नमुंमपा शाळा क्र . ४ सी.बी.डी. बेलापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या तुकड्यांचे प्लॅस्टिक बाटलीत केलेले संकलन अंकुर संस्थाप्रमुख गीता देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वच्छता शपथेच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध असून ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता व जागरूकता वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगितले. महापालिकेला स्वच्छतेत देशात पहिल्या क्र मांकावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करू या, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर भागात मदतीसाठी गेलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकाकडून चांगले काम होत असल्याचे अभिप्राय तेथील नागरिकांकडून मिळत असून मदतकार्य करण्यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य पथकही औषधांसह तयार असून जिल्हा प्रशासनाकडून सूचना आल्यानंतर मदतीसाठी रवाना होणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. या वेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, सलुजा सुतार, गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, अमोल यादव, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, रस्ता सुरक्षिततेचा संदेश प्रसारित करणारे बाइकर्स,विविध वयोगटातील नागरिकांची याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सीबीडी येथील कोकण भवन येथे महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नेरुळ सेक्टर १९ मधील भीमाशंकर, सफल, लेण्याद्री, व्टेलस्टार, निलसिद्धी सोसायट्यांमध्ये महापालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पनवेलमध्ये महापौरांच्या हस्ते ध्वजारोहणपनवेल महानगर पालिकेच्या मुख्यालयात महापौर कविता चोतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह पालिका अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.पनवेल तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल महानगर पालिका, तहसील, प्रांत, पोलीस ठाणे तसेच शाळा महाविद्यालयात सकाळी ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयाच्या तालुका क्र ीडा संकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्र म पार पडला. या वेळी प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले उपस्थित होते. याव्यतिरिक्त तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध रहिवासी संकुल आदी ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. खारघर शहरात युवा प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. खारघर ते लोणावळा स्पिरिट आॅफ इंडिपेन्डन्स राइड २0१९ चे आयोजन करण्यात आले होते. खारघर ते लोणावळा दरम्यान बाइक राइड करूनलोणावळा येथील टायगर पॉइंट येथे या ग्रुपच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले.पालिका कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणतुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुद्ध विहार संस्थेच्या वतीने महापालिका कर्मचाºयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा गायकवाड यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्र माला तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रभक्तीपर कार्यक्र मऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध राष्ट्रभक्तीपर कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या बँड पथकाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्र मानिमित्ताने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्र माला बाबासाहेब गायकवाड, अ‍ॅड. गौरी वेंगुर्लेकर, प्रसाद चौलकर, कीर्ती समगर आदी मान्यवर उपस्थित होते.विद्या प्रसारक शाळेत गणवेश वाटपविद्या मंडळ संचालित प्राथमिक विद्यामंदिर बेलापूर विद्याप्रसारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कोळी यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्यकारी मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायन शाळेत स्वातंत्र्य दिन साजरानेरु ळ येथील रायन इंटरनॅशनल शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मानिमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्ये केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धेत मोलाची कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईIndependence Dayस्वातंत्र्य दिन