शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:52 IST

नवी मुंबईतील खाजगी शाळांचा पुढाकार : पालिकेच्या शाळाही सुरू होणार

नवी मुंबई : कोरोना संकटामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी बुधवारपासून आॅनलाइन शाळा सुरू करण्यासाठी नवी मुंबई शहरातील अनेक खाजगी शाळांनी भर दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांनादेखील आॅनलाइन शिक्षण देण्याबाबत महापालिका प्रशासन विचाराधीन आहे.

नवी मुंबई शहरात अनेक खाजगी शाळा आहेत. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी यामध्ये सीबीएसईच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा झाल्या होत्या. त्याअनुषंगाने त्यांचे आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या सीबीएसईच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाला या वर्षी आॅनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. त्यानंतर मे महिन्यात सुट्टी देऊन जून महिन्यात पुन्हा आॅनलाइन अभ्यासाला सुरुवात करण्यात आली आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीत शिकणाºया लहान विद्यार्थ्यांवर आॅनलाइन शिक्षणाचा ताण येऊ नये यासाठी दररोज दोन ते तीन विषयांचे तास, तर इतर इयत्तांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे सुमारे चार ते पाच विषयांचे तास घेण्यात येत आहेत. काही शाळांमधून योगाच्या तासाने सुरुवात केली जात आहे.नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिका विविध विषयांचे व्हिडीओ बनविणार असून, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्हिडीओ पाठविण्याच्या विचाराधीन प्रशासन आहे.नव्याने शाळा प्रवेशाविषयी संभ्रमच्आॅनलाइन पद्धतीने शाळा सुरू केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये नवीन अ‍ॅडमिशन कधी होणार? त्याची प्रक्रिया कशी असणार? याबाबत कोणतीही नियमावली तयार करण्यात आली नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे.च्आरटीईअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे; परंतु अ‍ॅडमिशनची प्रकिया झालेली नाही. शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल की काय? अशी भीती पालक व्यक्त करीत आहेत.