शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

नेरूळच्या नाल्याचे काम संथ गतीने

By admin | Updated: March 28, 2016 02:31 IST

नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केले. १० कोटी ६७ लाखांच्या कामाची मुदत महिन्यापूर्वीच संपली आहे.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केले. १० कोटी ६७ लाखांच्या कामाची मुदत महिन्यापूर्वीच संपली आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या नाल्यांमध्ये नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याचा समावेश होतो. नाल्याच्या बाजूला रहिवासी संकुल असून तेथील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी या नाल्याची सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. पालिका निवडणुकीपूर्वी या नाल्याची सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. २० फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रत्यक्षात कामाची सुरवात झाली. वर्षभरामध्ये काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारास दिली होती. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरवात पावसाळ्यानंतरच केली आहे. डिसेंबरपर्यंत अत्यंत धीम्या गतीने काम सुरू होते. कामाची मुदत संपत आल्यानंतर ठेकेदाराने वेगाने काम करण्यास सुरवात केली आहे. मुदत संपून एक महिना झाला तरी अद्याप पूर्ण काम झालेले नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक आहे. पावसात केलेले कामही फुकट जाण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला आहे. पालिका नाल्याची सुधारणा करण्यासाठी तब्बल १० कोटी ६७ लाख रूपये खर्च करत आहे. एवढा खर्च करूनही काम वेळेत होत नसेल तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिक विचारू लागले आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनाचा निष्काळजीपणा : महापालिकेचा एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. पालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ठाणे - बेलापूर रोड व इतर सर्व प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. यामुळे पालिकेला ठेकेदारास जादा पैसे द्यावे लागले आहेत. नेरूळमधील नाल्याच्या कामामध्येही वाढीव रक्कम द्यावी लागणार का, असा प्रश्नही विचारला जात असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या घटना होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.