शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळचा आर्यन खुराणा नवी मुंबईत प्रथम

By admin | Updated: June 4, 2017 03:54 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसएई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील सर्वच सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसएई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील सर्वच सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नेरुळमधील आर्यन खुराणा या विद्यार्थ्याने ९९ टक्के गुण संपादन केले आहेत. आर्यन हा नेरुळमधील दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. आर्यनला मिळालेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या यशामुळे खूपच आनंद झाला असून, एक यशस्वी इंजिनीअर बनायचे आहे, अशी प्रतिक्रिया आर्यनने व्यक्त केली. यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी सरावावर अधिक भर दिला पाहिजे आणि ध्येय निश्चित केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला आर्यन दिला. नेरुळमधील रुचीरा रेड्डी या विद्यार्थिनीला ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत, तर संचित गुप्ता या विद्यार्थ्याला ९७.८ टक्के गुण मिळाले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधील २३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २०५ विद्यार्थ्यांनी ८६ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. बेलापूरमधील भारती विद्यापीठ शाळेतील पूजा मुल्या या विद्यार्थिनीला ९२.६ टक्के, तर विधी ठक्कर हिला ९१ टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे यश संपादन केल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक आनंद बागल यांनी व्यक्त केली. दिव्यांग गटातील अंजली यादवला ८४.२० टक्के- शारीरिक अपंगत्वावर मात करत, खारघरमधील रामशेठ ठाकूर शाळेच्या अंजली यादव हिने ८४.२० टक्के गुण मिळविले आहे. अंजलीला इंग्रजी विषयात ८६, हिंदीमध्ये ८७, माहिती तंत्रज्ञान यामध्ये ९१, विज्ञानामध्ये ८१ आणि समाजशास्त्रात ८२ गुण मिळाले आहेत. - शिक्षकांनी आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन,अभ्यासात केलेली मदत, तसेच वर्षभर घेतलेली मेहनत यामुळेच हे यश संपादन करणे सोपे झाल्याचे अंजलीने स्पष्ट केले. शाळेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अंजलीचे विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.