शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळ-उरण लोकलला १५ आॅगस्टचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:34 IST

नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आल्याने या मार्गावर १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष लोकल सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आल्याने या मार्गावर १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष लोकल सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी या मार्गाची पाहणी केली. उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या पाच स्थानकांचा समावेश आहे. यातील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकाच्या तरघर स्थानकाचे काम सुरू आहे. हे स्थानक अत्याधुनिक स्वरूपाचे असणार आहे. लोकेश चंद्र यांनी शनिवारी सीवूड्स स्थानकासह तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांची पाहणी केली. यापैकी सीवूड्स, बामणडोंगरी आणि खारकोपर स्थानकांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ट्रॅकिंग, टॅक्शन आणि टेलिकम्युनिकेशन आदी कामांसाठी ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. तरघर स्थानकाचे काम जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तरघर स्थानकाचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण झाले तरी सध्या या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सीवूड्स ते खारकोपर या पहिल्या टप्प्यातील अंतर १२ किमी इतके आहे, तर त्यापुढील म्हणजेच खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी इतके आहे. एकूण २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे यांच्याकडून अनुक्रमे ६७: ३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. एकूण १७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गावर चार उड्डाणपूल, १५ सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे.नेरूळ-उरण मार्गावर नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २0१७ मध्ये पहिला टप्पा सुरू करण्याचे सिडकोकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु विविध कारणांमुळे कामाची गती मंदावल्याने मार्च २0१८ची डेडलाइन देण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा मुहूर्तही टळला आहे. आता १५ आॅगस्ट २0१८ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.तरघर स्थानक : उत्कृष्ट वास्तुशिल्पया मार्गावरील तरघर हे भव्य व दिव्य रेल्वेस्थानक ठरणार आहे. या स्थानकासाठी तब्बल ११२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा काढून बी.जी. बेलेकर कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. यात २७0 मीटर लांबीचे चार फलाट प्रस्तावित करण्यात आले आहेत. स्थानकाच्या इमारतीत वाणिज्य कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. यात विविध कार्यालयांसह दोन तिकीट कार्यालये असणार आहेत, तर स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले असून वाहनतळावर जाण्यासाठी रॅम्पची सुविधा असणार आहे. एकूणच तरघर स्थानक नेरूळ-उरण मार्गावरील वास्तुशिल्पाच्या दृष्टीने एक आकर्षण ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.