शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ स्टेशनमध्ये मद्यपींसाठी प्रवाशांना धरले वेठीस

By admin | Updated: September 14, 2016 04:40 IST

नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात.

नामदेव मोरे,  नवी मुंबई नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात. अनेक वेळा महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. दारू विकणारे व पिणाऱ्यांना पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे. नवी मुंबईमधील सर्वाधीक गर्दी असणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये नेरूळचाही समावेश होतो. नेरूळ पश्चिमेला माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची वस्ती आहे. येथील जवळपास १ लाख नागरिक रोज रेल्वेने ये -जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच सिडकोने मद्यविक्री करणाऱ्यांना दुकानाची विक्री केली आहे. जवळपास एक वर्षापासून येथे उघड्यावर मद्यपान सुरू आहे. दारू दुकानदाराने येथे मद्यपान करण्यास मनाई असल्याचा फलक लावला आहे. परंतु तो फक्त औपचारिकता म्हणून. येथे दारू विकणाऱ्यांना सोडा, पाणी पुरविण्यासाठी एकास जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. चकण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळतील याची सोय केली आहे. दारू पिण्यासाठी ग्लास उपलब्ध करून दिले जात आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ पाच तासामध्ये तब्बत ५०० ते ६०० जण येथे मद्यपान करत आहेत. गुंड प्रवृत्तीचे काही तरूण रेल्वेतून प्रवासी बाहेर येवू लागले की प्रवेशद्वारावर उभे राहतात व प्रवाशांसमोर दारू पितात. कोणी या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण केली जात आहे. येथील जिन्यांपासून मोकळ्या जागेवरही तळीरामांनी बस्तान मांडलेले चित्र दिसू लागले आहे.नेरूळ स्टेशनच्या पश्चिमेला सायंकाळी ६ ते ११ दरम्यान जवळपास २५ हजार प्रवाशी येत असतात. यामध्ये ८ ते १० हजार महिलांचा समावेश आहे. अनेक टपोरी तरूण दारू पिवून महिलांची छेड काढत आहेत. महिलांकडे पाहून शेरेबाजी करत आहेत. यामुळे अनेक महिलांनी या प्रवेशद्वाराकडून येण्याचे बंद केले आहे. एक वर्षापासून सुरू असलेल्या चा अवैध प्रकाराकडे पोलिस, रेल्वे व सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे.