शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये लाटला नेरुळचा रस्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 02:45 IST

कोट्यवधी किमतीच्या जागेचा घोटाळा : अतिक्रमण विभागानेही दिला वरिष्ठांना अहवाल

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊनदरम्यान अतिक्रमण करून रस्ताच बळकावल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मिळून एकत्रित हा भूखंड हडपला आहे. 

 या अतिक्रमण संदर्भात नेरुळच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण सर्व्हिस रोडवर झाल्याचा अहवालही वरिष्ठांना सादर केलेला आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास रहिवाशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून त्यांना बेघर करू नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याच निर्देशाचा सोयीनुसार अर्थ लावत या रस्त्यावरील वाढीव बांधकामांना पाठबळ देण्याचे काम काही अधिकारी करत असल्याचाही आरोप होत आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नेरुळ सेक्टर १८ ए येथे आगरी कोळी भवनच्या समोरील मार्गावर असलेल्या रो हाउसच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. तिथल्या रो हाउसधारकांना वाहने वळविण्यासाठी तीन मीटरचा रस्ता (सर्व्हिस रोड) ठेवण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या सर्व्हिस रोडचा वापर आजवर रो हाउसधारकांकडून वाहने पार्किंग करण्यासाठी वापरला जात होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत, तिथल्या पंधराहून अधिक रो हाउसधारकांनी एकत्रितरीत्या संपूर्ण रस्ताच बळकावला आहे. तीन मीटर रुंदीच्या या संपूर्ण रस्त्याचे क्षेत्रफळ दहा गुंठ्याहून अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सद्यस्थितीला नेरुळमधील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असून, गुंठ्याला कोटीच्या घरात किंमत आहे. त्यानुसार, बळकावण्यात आलेला रस्त्याचे मूल्य कोट्यवधींच्या घरात असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी बांधकाम सुरू असतानाच, अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली होती, परंतु रस्ता हडपणाऱ्या व्यक्ती प्रतिष्ठित असल्याने, शिवाय त्यांना राजाश्रय असल्याने कारवाईकडे कानाडोळा झाल्याचा आरोप होत आहे. 

कोट्यवधींचा भूखंडनेरुळ सेक्टर १८ ए मधील तीन मीटरचा रस्ता बळकावण्यात आला आहे. भूखंड क्रमांक ९७ ते १००, १०५, १०६, ११७ ते १२४ या भूखंडांचा समावेश आहे. त्यांनी बळकावलेल्या भूखंडाची किंमत सध्या कोट्यवधींच्या घरात आहे.

त्रयस्थ व्यक्तींना जागानेरुळ सेक्टर १८ ए येथे आगरी कोळी भवनच्या समोरील मार्गावर असलेल्या रो हाउसच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. रस्त्याची जागा रो हाउसधारकांनी स्वतःच्या मालकीची भासवून त्या ठिकाणी खासगी गार्डन, पार्किंग यांची सोय करण्यात आली आहे. तर काहींनी बळकावलेल्या रस्त्याची जागा त्रयस्थ व्यक्तींना व्यवसायासाठी भाड्याने दिल्याची चर्चा आहे. यावर कोणाचा वचक नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका