शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवासाला मे महिन्याचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:03 IST

नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या नेरुळ येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नेरुळ ते भाऊचा धक्का या दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार मे २०२० पासून या मार्गावर प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना सिडकोने बनविली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील नेरुळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे तीन हेक्टर जागेवर जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. यात पाइल्ड प्लॅटफॉर्मवर टर्मिनलला जोडणारा रस्ता, टर्मिनलची इमारत, पार्किंग सुविधा, नेव्हिगेशनल आणि मार्शलिंग क्षेत्राचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने १११ कोटी रुपयांची तरतूद केली असून, एप्रिल २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज सिडकोने व्यक्त केला आहे. त्यानंतर मे २०२० पासून नेरुळ ते भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोने आले आहे.>रस्ते वाहतुकीपेक्षा प्रस्तावित जलमार्ग अधिक सुकर व गतिमान असणार आहे. या जलमार्गामुळे मुंबई व नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. सुरू करण्यात येणाऱ्या कॅटामरान सेवेमुळे नेरुळ ते भाऊचा धक्का हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हा जलमार्ग अत्यंत उपयुक्त ठरणारा असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोसह बीपीटी, जेएनपेटी व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त प्रयत्नातून नवी मुंबई ते मुंबई दरम्यान, जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे.सध्या नेरुळ येथील जेट्टीचे काम प्रगतिपथावर आहे. एप्रिल २०२० पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण करून मे २०२० पर्यंत प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.