शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविषयी निष्काळजीपणा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:26 IST

४९ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास; वेळेत उपचार न घेतल्यामुळे धोका 

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना चाचणीविषयी गैरसमज व दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक होत असून, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात उपचार घेणारे ४९ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी केली व उपचार सुरु केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.             

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९६२४ असून, त्यापैकी ४५८१ रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल ४९ टक्के रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. प्रतिदिन ५२ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन मिळविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची मागणी वाढू लागली आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना जागा मिळविताना नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व आरोग्य विभाग सर्वांचीच दमछाक हाेत आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे तरुणांनाही ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. कोरोनाविषयी गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.  लक्षणे दिसू लागल्यानंतर व रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही अनेकजण चाचणी करुन घेत नाहीत. चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, असा लोकांनी गैरसमज घेतला जात आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करण्याऐवजी फॅमिली डॉक्टरकडून औषधे घेऊन तीन - चार दिवस फुकट घालवले जात आहेत. 

चाचणी पॉझिटिव्हच येते हा गैरसमजकोरोनाची चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, हा गैरसमज आहे. नवी मुंबईमध्ये ८ लाख ६२ हजार ६०३ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त ८८,०३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल ७ लाख ७४ हजार ५५९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून, ९० टक्के निगेटिव्ह आहेत. यामुळे कोणताही गैरसमज करून न घेता लक्षणे दिसली की, चाचणी करणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नागरिकांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरु झाल्यास प्रकृती चिंताजनक होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.- अभिजीत बांगर, आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या