शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरण रोखण्यासाठी एकजुटीची गरज, उरणमध्ये जेएनपीटीतील कामगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:12 IST

देशातील एकमेव नफ्यात चालणाऱ्या जेएनपीटी बंदराचे खासगीकरण कोणी करू पाहत असेल तर येथील प्रकल्पग्रस्त, कामगार ते कदापि सहन करणार नाहीत.

उरण : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभे राहिलेले, देशातील एकमेव नफ्यात चालणाऱ्या जेएनपीटी बंदराचे खासगीकरण कोणी करू पाहत असेल तर येथील प्रकल्पग्रस्त, कामगार ते कदापि सहन करणार नाहीत. जेएनपीटीच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावण्यासाठी प्रकल्पग्रस्त, कामगार आणि कामगार संघटना यांनी संघटित होण्याचे आवाहन कामगारनेते तथा जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील यांनी शुक्रवारी आयोजित कामगार मेळाव्यात केले.जेएनपीटी रुग्णालयाचे, त्यानंतर जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी जेएनपीटी कामगार एकता संघटना संलग्न आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशन यांच्या माध्यमातून जेएनपीटी वसाहतीमधील मल्टिपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हीच ती वेळ खासगीकरण रोखण्याची, अशी हाक देत आयोजित करण्यात आलेल्या कामगार जागृती मेळाव्यात सुमारे ४०० कामगार उपस्थित होते. कामगारांना मार्गदर्शन करताना एकता संघटनेचे अध्यक्ष तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील हे बोलत होते.जेएनपीटी बंदरात काम करणारे कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. त्या कामगारांचे हीत न जपता, तसेच मयत कामगारांच्या वारसांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता जेएनपीटी व्यवस्थापन एमजीएम,डी. वाय. पाटील यांच्याबरोबर रुग्णालयाचे पीपीपी धोरण अवलंबून जेएनपीटीचे खासगीकरण करीत असतील तर हा हुतात्म्यांचा, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभारण्यात आलेल्या बंदरात काम करणाºया कामगारांचा अवमान आहे. तो कदापि सहन करणार नाही. त्या विरोधात व येथील कामगारांना, त्यांच्या वारसांना आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि व्यवस्थापनाचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी एकसंघ होऊ या, असा निर्धारही दिनेश पाटील यांनी व्यक्त केला.>जेएनपीटी कामगार एकता संघटनेच्या माध्यमातून कामगारनेते दिनेश पाटील हे व्यवस्थापनाच्या बोर्ड बैठकीत कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. त्यांनी कुणाल ठाकूर व स्वप्निल भोईर या मयत कामगारांच्या वारसांना बंदरात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम केले आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारे कामगारनेते दिनेश पाटील यांच्या पाठीशी कामगार, प्रकल्पग्रस्तांनी खंबीरपणे उभे राहाण्याचे आवाहन पंडित घरत यांनी केले. या वेळी किरण जिकमाडे, सुषमा म्हात्रे, पी. वाय. कडू, सचिन कडू, नागेश भोईरकर, डॉ. सकपाळ, गणेश म्हात्रे, एल. जी. म्हात्रे, अरुण कडू यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी कामगारांनी खासगीकरण धोरणाविरोधात घोषणाबाजीही केली.