शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:25 IST

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे मत; पनवेल येथील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पनवेल : सध्या भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण दिले जाते. यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन ही संस्था महत्त्वाची आहे. सध्या सार्वजनिक आरोग्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत केंद्र्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या पनवेल येथील नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत आदींसह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवासी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाºया इमारतीच्या कोनशिलेचेसुद्धा या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आयुष्मान भारत योजना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवित आहोत. या योजनेअंतर्गत सुमारे ८६ लाख जणांनी आपला सहभाग नोंदविला आहे. मागील ७० वर्षांत आरोग्यसेवेबाबत ज्या पद्धतीने काम होणे गरजेचे होते ते झाले नसल्याची खंत व्यक्त करीत याला काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी केला.या अभ्यासक्रमाचा समावेशसंस्थेत पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण वेळेचे दोन प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर हे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये सॅनिटरी हेल्थ इन्पेक्टर कोर्स, डायबेटीस एज्युकेटर, फर्स्ट रिस्पाँडर, होम हेल्थ एड, जनरल ड्युटी असिस्टंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रमुख समुदायांवर आधारित संशोधन उपक्रमसुद्धा या संस्थेतर्फे राबविले जातात. या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संकुलात भारतासह दक्षिण पूर्व आशियामधून येणाºयांना आधुनिक दर्जाची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.