शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:16 IST

दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

पनवेल : दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास, अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले.पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस चालक, मालक, शाळेचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बस चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा या बसेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार होतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी एकमेकांवर न टाकता प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.उपस्थितांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार, सतीश देशमुख, पनवेलचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, पनवेल शहर वाहतूक विजय कादबाने आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना उपस्थित पालकांना व बस चालक मालक, शिक्षकांना करण्यात आल्या. उपस्थितांना वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी चित्रफीत दाखवून अपघातांच्या संदर्भात उपस्थितांना जागृत करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या माहितीसंदर्भात स्कूल बस धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई