शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पनवेलमध्ये नाला व्हिजनची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:55 IST

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गटारांची अवस्था बिकट झाली आहे.

- अरुणकुमार मेहेत्रे

कळंबोली : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गटारांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांमधील पाणी रोडवर येत आहे. झाकणे नसल्यामुळे गटारांमध्ये पडून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल व पूर्वीच्या नगरपालिका कार्यक्षेत्रामधील स्थितीही बिकट झाली असून, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नाला व्हिजन राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पनवेल शहरात एमएमआरडीच्या माध्यमातून काही मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काही रस्ते महापालिकेने तयार केले आहेत. मात्र, त्या ठिकाणच्या पदपथांची स्थिती फारशी चांगली नाही. शहरातील झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी तर पदपथ गायबच झाले आहेत. त्या ठिकाणी अतिक्र मण झाले असल्याने गटार गायबच झाले आहेत. कित्येक ठिकाणी गटारे उघडीच दिसतात, त्यामुळे पनवेलकरांना चालणे जिकिरीचे बनत आहे. शाळेच्या आजूबाजूची स्थितीही बिकट झाली आहे. सिडको वसाहतीत म्हणजेच नवीन पनवेल, खांदा वसाहत आणि कळंबोलीत पावसाळी गटारे आहेत. मात्र, त्यांच्यावरील झाकणे गायब आहेत, यामुळे पादचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक संकुल, रुग्णालये त्याचबरोबर सोसायट्यांच्या आजूबाजूला ही स्थिती असल्याने नागरिकांकडून सिडकोकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्यांच्याकडून उपाययोजना केल्या जात नाहीत.

पनवेल-मुंब्रा महामार्गालगत १२ वर्षांपूर्वी सिडकोने तयार केलेले १२ फूट खोल बंदिस्त पावसाळी गटार अपूर्ण आहे. काही ठिकाणी स्लॅब बाकी आहेत, तर झाकणेही गायब आहेत, या बाबत शिवसेनेने आवाज उठवून वस्तुस्थिती सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. कामोठे वसाहतीत मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाºया रस्त्यालगत पदपथावरच खडी टाकण्यात आलेली आहे. अंतर्गत भागातील गटारांवरील बरीच झाकणे दिसत नाहीत. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात गटारांची स्थिती बिकट झाली आहे. पदपथावरून चालताना शाळकरी मुले व नागरिक गटारात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन याकडे गांर्भीयाने पाहणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.सहा महिन्यांत तीन दुर्घटनाउघडी गटारे तसेच झाकणे नसल्याने लहान-मोठे अपघात घडतात. काही दिवसांपूर्वी कळंबोलीतील सेक्टर-१0 ई येथील ऋ षी सुब्रमण्यम हा शाळकरी मुलगा उघड्या गटारात पडून गंभीर जखमी झाला होता. तक्का येथे एक ४२ वर्षांची एक व्यक्ती गटारात पडली होती. कामोठे सेक्टर २२ येथे एक ज्येष्ठ व्यक्ती उघड्या गटारामुळे जखमी झाली होती.या ठिकाणची अवस्था बिकटच्पनवेल शहर : पटेल मोहल्ला, इंडी दवाखाना, जयमहाराष्ट्र बेकरी, ग्रामीण रुग्णालय, वसंतकृपा इमारत उरण रोड, पंचरत्न हॉटेल, आशादीप सोसायटी, साई प्लाझा, लक्ष्मी वसाहत, चॅनेल प्लाझा तक्का, गोदरेज स्काय गार्डनजवळ, तक्का.च्कामोठे : खांदेश्वर रेल्वेस्टेशन रोड, आचार्या रामेश वसतिगृहासमोर.च्कळंबोली : सेक्टर-१५, स्वॉन सोसायटी, सेक्टर-१६ उमा पॅलेस, सेक्टर-१४मधील अंतर्गत रोडलगतचे गटारे, सेंट जोसेफ हायस्कूल.च्खांदा वसाहत : आसूडगाव डेपो, नवरत्न बिल्डिंग सेक्टर-८.च्नवीन पनवेल : फिनिक्स हॉटेलसमोर, आदई तलावाजवळ, जलधारण जलाव सेक्टर-१४. 

गटारांची दुरुस्ती तसेच झाकणे बसविण्याकरिता महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. लवकरच बांधकाम विभाग याबाबत कार्यवाही करेल. पनवेल शहर आणि समाविष्ट गावात ही कामे केली जातील.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महापालिकाकळंबोली आणि कामोठे वसाहतीतील बहुतांशी ठिकाणी आम्ही नव्याने झाकणे बसवली आहेत. तरीसुद्धा कुठे गटारे उघडी असतील तर त्याबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल.- गिरीश रघुवंशी,कार्यकारी अभियंता, सिडको

टॅग्स :panvelपनवेल