शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सतर्क असणे आवश्यक

By admin | Updated: May 10, 2017 00:17 IST

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता मंगळवारी बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. कोकण विभागातील सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आपत्ती काळात तात्काळ मदत करु न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपायुक्त यांनी केले आहे. अवेळी पावसाने विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे वीज कोसळल्याने मनुष्यहानीसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.यादृष्टीने विभागात बसविण्यात आलेल्या वीजरोधक सुस्थितीत आहे किंवा नाही हे त्वरित पाहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.पावसाळ्यात बऱ्याचदा कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी मुंबई शहर बन्सी गवळी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे, वंदना सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अंकुश चव्हाण, मीरा -भार्इंदर महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, वसई - विरार महानगरपालिका उपायुक्त अजीज शेख, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील तसेच सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते. पूर रेषा निश्चित करणे, रस्त्यांची व पुलांची दुरु स्ती, औषध उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तात्पुरते निवारे, आरोग्य व स्वच्छता ठेवणे या अनुषंगाने केलेल्या कामाचा देखील बैठकीत आढावा घेण्यात आला.