शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

By admin | Updated: August 6, 2015 23:43 IST

महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून

नवी मुंबई : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून, आरोग्य समितीचे सभापतीपद काँगे्रसला देण्यात आले आहे. महापौर व स्थायी समितीप्रमाणे विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही युतीला काहीही चमत्कार दाखविता आलेला नाही. महापौर, उपमहापौर व स्थायी समिती निवडणुकीनंतर सर्व नगरसेवकांचे विशेष समित्यांच्या सभापती पदाकडे लक्ष लागून राहिले होते. वास्तविक निवडणुकांमुळे सभापतींची निवड करण्यास विलंब झाला. नवीन पदाधिकाऱ्यांना ७ ते ८ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी पहिल्या वर्षी सभापती होण्यास अनुत्सुक होते. सकाळी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व समित्यांवर काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व मिळविले. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे व पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती पदावर अशोक गुरखे यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावर अपर्णा गवते, आरोग्य समिती सभापतीपदावर काँगे्रसच्या पूनम पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीवर मोनिका पाटील, विधी समितीवर अ‍ॅड. भारती पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापतीपदावर गिरीश म्हात्रे तर उद्यान व शहर सुशोभीकरण समितीवर स्वप्ना गावडे यांची निवड झाली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुका पार पडल्या. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, रमाकांत म्हात्रे, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अभिनंदन केले.