शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणार्थी तरुणांना समजले नक्षलवादी!

By admin | Updated: February 2, 2016 02:06 IST

पुण्यावरून मुंबईला जात असलेल्या मालगाडीच्या चालकाला लोणावळा-कर्जत दरम्यान नाथबाबा या ठिकाणाजवळ रेल्वे पुलावर काही संशयित तरुण सैनिकांच्या वेशात रविवारी रात्री दिसल्याने

खालापूर : पुण्यावरून मुंबईला जात असलेल्या मालगाडीच्या चालकाला लोणावळा-कर्जत दरम्यान नाथबाबा या ठिकाणाजवळ रेल्वे पुलावर काही संशयित तरुण सैनिकांच्या वेशात रविवारी रात्री दिसल्याने या तरुणांच्या शोधासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणाच कामाला लागली होती. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मालगाडी चालकाच्या माहितीनुसार हे तरुण नक्षलवादी असावेत असा प्राथमिक अंदाज बांधून रायगड व पुणे पोलिसांनी जंगलात संयुक्त मोहीम राबवून या तरुणांचा शोध घेत होते. अखेर हे तरुण प्रशिक्षणासाठी खोपोलीत आल्याचे आणि रात्री ट्रेकिंगसाठी गेल्याचे उघड झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेने पोलीस यंत्रणेला कामाला लावले होते.पुणे येथून निघालेली मालगाडी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लोणावळा व कर्जत स्थानकाच्या दरम्यान असलेल्या नाथबाबा येथील रेल्वे पुलाजवळ आल्यानंतर मालगाडीच्या चालकाला सैनिकी वेशातील काही तरुण हातात बॅटरी घेवून उभे असल्याचे दिसले. हे तरुण रेल्वे पोलीस दलातील जवान किंवा सैनिक असावेत असे वाटल्याने मालगाडीच्या चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्याच वेळेस अंधारातून आणखी २० ते २५ तरुण रेल्वे रुळावर आले. या तरुणांच्या पाठीवर बॅगा होत्या त्यामुळे मालगाडीच्या चालकाला हे तरुण नक्षलवादी तर नाहीत ना? असे वाटले. घाबरलेल्या मालगाडी चालकाने याची माहिती कर्जत व लोणावळा रेल्वे पोलिसांना दिली. इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण जंगलात असलेल्या रेल्वे रुळावर दिसल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणाच कामाला लागली. खोपोली, कर्जत, खालापूर, नेरळ, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलिसांबरोबरच रेल्वे पोलीसही या संशयित तरुणांच्या शोधासाठी बाहेर पडले. अंधारात जंगलामध्ये हत्यारे घेऊन पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. रायगड व पुणे गुन्हे अन्वेषण विभागही शोध मोहिमेत गुंतला होता. खोपोलीचे पोलीस निरीक्षक एस.एम. शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खोपोलीतून जंगल भागात तपास सुरू केला. त्यावेळी झेनिथ कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या दत्तमंदिराजवळ तंबू टाकले असून सैनिकी वेशातील तरुण शिंदे यांना आढळून आले. अधिक तपास केल्यानंतर रिलायन्स कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग या ठिकाणी सुरू असून रात्री हेच तरुण रेल्वे रुळावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले. खोपोलीतील यशवंती हायकर्सच्या वतीने तरुणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाते. या प्रशिक्षणाची कुठलीच कल्पना पोलिसांना नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. हे सारे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आम्ही विविध कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण गेली २५ वर्षांपासून देत आहोत. यासाठी वनविभागाची जागा वापरत असल्याने त्यांची व श्री दत्त मंदिर देवस्थानची परवानगी घेतो. इतक्या वर्षात पोलिसांची परवानगी घेण्याचा प्रश्नच आला नाही. आमच्यामुळे पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.- राजाबापू सगळिगळे, समन्वयक, यशवंती हायकर्स खोपोली