शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई देशात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:37 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे.

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. पालिका क्षेत्रातील ७५० मेट्रिक टन घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असून ८५ टक्के कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. या कार्याची दखल केंद्राने घेतली असून पुरस्कारामुळे पालिकेचा बहुमान वाढला आहे.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूर, भोपाळ, चंदिगढ या शहरांनी पहिल्या तीन स्वच्छ शहरांचा बहुमान मिळविला आहे. पहिल्या तीनमध्ये येण्याचे नवी मुंबईचे स्वप्न भंगले असले तरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात सर्वोत्तम होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेने देशातील सर्वोत्तम क्षेपणभूमी तयार केली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. याशिवाय कचरा वर्गीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. १०० किलोपेक्षा कचरा निर्माण करणाºया सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स यांना त्यांच्या आवारामध्ये कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे करण्यात आले आहे. पालिकेनेही उद्यानांपासून शाळांपर्यंत सर्व ठिकाणी कचºयावर प्रक्रिया सुरू केली आहे. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ८५ टक्के झाले आहे. कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आरएफआयडी तंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अशाप्रकारे तंत्रप्रणाली वापरणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका आहे. पालिकेने वितरित केलेल्या कचरा कुंड्या व कम्युनिटी बिन्समधील कचरा उचलण्यात आला किंवा नाही याची खातरजमा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत केली जात आहे. कचरा वाहतूक करणाºया सर्व वाहनांचे जीपीएस व जीपीआरएस नियंत्रण केले जात आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा ओला कचरा प्रक्रिया करून सेंद्रिय खतात रूपांतरित केला जात असून त्या खताला शेतीसाठी चांगली मागणी आहे. सुक्या कचºयामधून प्लास्टिक वेगळे करून प्लास्टिक अ‍ॅग्लो तयार केले जातात. ज्याचा वापर प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगात होत आहे. या अ‍ॅग्लोचा वापर करून दहा रस्ते तयार केले आहेत. नवी मुंबईचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे महापौर जयवंत सुतार, आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासह सर्व पदाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.>स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा निर्णय हा नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. याचे सर्व श्रेय संपूर्ण नवी मुंबईकरांचे आहे.- जयवंत सुतार, महापौरस्वच्छता सर्वेक्षणामध्ये आलेला नंबर ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून लागलेली सवय ही कायमस्वरूपी रहावी व स्वच्छतेमधील स्थान कायम उंचावत रहावे यासाठी सर्वांनी जागरूक रहावे.- रामास्वामी एन.,आयुक्त महापालिका