शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: राज्यातील बहिणी केवळ पोस्टवर सुरक्षित, अंबादास दानवेंचा सरकारला टोला

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 29, 2024 17:53 IST

Navi Mumbai News: राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई -  राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी राज्याच्या कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचे अशा घटनांवरून स्पष्ट होत असल्याचीही टीका त्यांनी केली.

बेलापूर येथील अक्षता म्हात्रे (आगास्कर) यांच्या मारेकरूला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येवरून उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही घटनांच्या अनुशंघाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तपास बारकाईने व्हावा व पीडित कुटुंबाना न्याय देऊन त्यांचे दुःख कमी करण्यास मदत करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. तर या घटनांवरून गृहमंत्र्यांना भेटून काही होऊ शकणार नसल्याने राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यात लाडकी बहीण असा गवगवा होत असतानाच बहिणींवर अशा प्रकारे अत्याचार घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावरून कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचीही टीका त्यांनी केली. तर सरकार मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात असे म्हणत, सध्या केवळ पोस्टवर महिला सुरक्षित असल्याचीही टीका त्यांनी केली.

यावेळी अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांसह शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, किशोरी पेडणेकर, संजना घाडी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रकाश पाटील, सुमित्र कडू, सोमनाथ वास्कर, प्रवीण म्हात्रे, संदीप पाटील, समीर बागवान, महेश कोटीवाले आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाकडून लागलेल्या बिलाच्या तगाद्यामुळे नरेंद्र गाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बिल वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी व्यवस्थापनावर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAmbadas Danweyअंबादास दानवे