शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवी मुंबईकरांनी थकविली तब्बल 64 कोटींची पाणीपट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:49 IST

१८ टक्के पाणीगळती : शासकीय कार्यालयांनीही थकवले बिल

- योगेश पिंगळे नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, सिडको कार्यालय, रेल्वे स्थानके, पोलीस ठाणे आदी ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची थकबाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून, थकलेल्या पाणी बिलापोटी महापालिकेला एकूण सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचे येणे बाकी आहे.नवी मुंबई पालिकेच्या स्वतःच्या मालकीचे धरण असल्याने नवी मुंबई शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. मोरबे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ८८ मीटर असून, नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. नवी मुंबई शहरात गाव-गावठाण, झोपडपट्टी, शहरी भाग असून, सिडको वसाहती आणि गाव-गावठाणातील घरांना स्वतंत्र नळजोडणी देण्यात आली आहे. शहरातील खासगी गृहसंकुले, सोसायट्याच्या पंप हाऊसमध्ये पाणी पुरवठा केला जातो. झोपडपट्टी भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सार्वजनिक नळांची सुविधा देण्यात आली आहे. पाण्याची चोरी आणि गळती थांबविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून स्काडा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. तरी अनेक ठिकाणी पाण्याची चोरी आणि गळती मात्र सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत असल्याचे महापालिकेकडून नोंदविण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील शासकीय कार्यालये, सिडको, पोलीस ठाणे, एमटीएनएल कार्यालये, रेल्वे स्थानके, शासकीय बँका आदींना महापालिकेच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा केला जातो; परंतु या कार्यालयांनी गेल्या काही वर्षांपासून पाणी बिलाचा भरणा केलेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी महापालिकेला येणे बाकी असून, अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून पाण्याच्या बिलाचा भरणा केला नाही. २० वर्षांपासून पाणी बिलात वाढ नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेला पाणी पुरवठा सुविधेसाठी होणारा खर्च पाण्याच्या बिलामधून वसूल होणे अपेक्षित आहे; परंतु नवी मुंबई शहरात गेल्या २० वर्षांपासून पाणी बिलात कोणत्याही प्रकारे वाढ झाली नाही. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक समस्या येत आहेत.पाणीकर थकलानवी मुंबई महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा सुविधेचा सुमारे सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा कर थकला आहे. यामध्ये प्रामुख्याने शासकीय कार्यालयांचा प्रलंबित पाणीकर मोठ्या प्रमाणावर असून, अनेक नागरिकांनीही बिले भरलेली नाहीत.पाणी गळती रोखण्यासाठी स्काडा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांकडे असलेल्या पाणी बिलाच्या थकबाकीसाठी परस्पर सहमतीने समायोजन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- अभिजित बांगर आयुक्त, न.मुं.म.पा.महापालिकेच्या हद्दीबाहेर             ४० एमएलडी पाणीपुरवठा पनवेल महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दररोज खारघर विभागासाठी १० एमएलडी आणि कामोठे विभागासाठी २५ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, तसेच मोरबे धरण क्षेत्रात दररोज पाच एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका