शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘फिफा’च्या सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, स्टेडिअम परिसरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:33 IST

‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे.

नवी मुंबई : ‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. सामन्यांदरम्यान स्टेडिअम परिसरामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी शहरामध्ये येत आहेत. यानिमित्ताने शहराचे नाव जगभर जाणार आहे. स्पर्धेदरम्यान कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून महापालिका, पोलीस, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट अ‍ॅकॅडमी व सर्व सरकारी अस्थापनांनी दिवसरात्र परिश्रम घेतले आहे. मॅच पाहण्यासाठी येणाºया प्रत्येक प्रेक्षकांची कसून तपासणी केली जाणार आहे. ५० पेक्षा जास्त मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मैदानामध्ये व बाहेर आवश्यक त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष वॉर रूम तयार करण्यात आली आहे. सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण वॉररूममधून केले जाणार आहे.स्टेडिअमच्या चारही बाजूला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्बशोधक पथक, दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहेत. १३ हजार वाहने उभी करता येतील, अशी व्यवस्था केली असून सर्व वाहतूक पोलीस शुक्रवारी ‘फिफा’च्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. ‘फिफा’साठी सायन-पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी सुशोभीकरण केले आहे. शहरातील सर्व महत्त्वाचे चौक व रोडवर फुटबॉल खेळतानाच्या प्रतिकृती, फुटबॉल नेट बसविण्यात आली आहेत. महामार्गावरून रोड ओलांडण्याची वेळ येऊ नये यासाठी पत्र्यांचे कुंपण तयार करण्यात आले आहे. स्टेडिअम परिसरामध्ये ई-टॉयलेट बसविले असून, जादा साफसफाई कर्मचारी या परिसरात तैनात केले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFootballफुटबॉल