शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान करणार नवी मुंबईतील विकासकामांचे लोकार्पण

By कमलाकर कांबळे | Updated: January 2, 2024 20:18 IST

Navi Mumbai: एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकसहचे नवी मुंबईतील नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आणि दिघा रेल्वेस्थानकाचे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई -  एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकसहचे नवी मुंबईतील नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आणि दिघा रेल्वेस्थानकाचे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सिडकोने तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित कार्यक्रमांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिडकोने प्रस्ताव मागविले आहेत.

मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. शिवडी-न्हावा-शेवा-सी लिंकचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नेरूळ-उरण लोकल मार्गावरील खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पासुद्धा प्रवासी वाहतुकीस सज्ज आहे. दिघा रेल्वेस्थानक मागील तीन महिन्यांपासून प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. या प्रमुख विकास प्रकल्पांसह एमएमआर क्षेत्रातील इतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना आहे.

कार्यक्रमाचा खर्च पावणेतीन कोटीया नियोजित कार्यक्रमाची तयारी करण्याचे निर्देश सिडकोच्या संबंधित विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या नियोजित कामांत प्रवेश, निर्गमन आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी २ कोटी ६५ लाख ७१ हजार ७८६ रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. विशेष म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. यावरून पंतप्रधानांचा हा नियोजित सोहळा फेब्रुवारी महिन्यातच होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNavi Mumbaiनवी मुंबई