शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत  मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:18 IST

दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी मुंबई - दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जातात. मे महिन्याच्या अखेरीस ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक भागात नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: ऐरोली व दिघा परिसरात पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसली.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने झालेल्या कामांचे पितळही उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वृक्ष छाटणी न झाल्याने शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याच्या दुर्घटना घडल्या.पावसाच्या पहिल्याच सरीत रस्त्यांवरील डागडुजी तकलादू ठरली. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने महापालिकेने पुन्हा या कामांना गती दिली आहे. रस्ते व पदपथांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.शहरात पाणी तुंबण्याची शक्यतानालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी वसाहतीअंतर्गत छोट्या नाल्यांतील गाळ उपसण्याचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच मोठ्या नाल्यांतील गाळ यावर्षी उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून त्यातील पाणी वसाहतीत घुसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या