शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, पनवेल, उरणची रुग्णसंख्या एक लाखाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:06 IST

८५,८८७ कोरोनामुक्त : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले , दोन टक्के रुग्णांचा मृत्यू

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. नवीन प्रकारचा कोरोना पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहरवासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असले तरी नागरिकांकडून मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू झाले आहे. नवी मुंबई, पनवेल व उरणमधील रुग्णसंख्या तब्बल ८९ हजार ३४० झाली आहे. प्रतिदिन सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असून नागरिकांनी योग्य काळजी घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन महानगरपालिका, एक नगरपालिका, जेएनपीटी बंदर व दाेन औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. काेरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणाऱ्या शहरांमध्येही नवी मुंबईचा समावेश आहे. पनवेल व उरण परिसरामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पनवेलमध्ये आहेत. आरोग्य विभागाने प्रयत्न करून प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. यामुळे नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्कचा वापर व गर्दी टाळणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांकडून आता नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. सरकारी कार्यालयांमध्येही कामानिमित्त जाणारे नागरिकही अनेकदा मास्क वापरत नाहीत. मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेच्या नियमांचे उल्लंघन होते आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. परंतु मागील काही महिन्यांमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांच्या खाली येत नाही. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची गरजही अनेक रुग्णांना लागत आहे. नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाची जागृती तीनही शहरे कोरोनामुक्त करायची असतील तर नागरिकांनी नियमांचे कोटेकोर पालन करणे आवश्यक असून प्रशासनानेही त्यादृष्टीने जनजागृती सुरू केली आहे.